Mumbai Pune Travel : मुंबई ते पुणे दरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करतात. राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुणे ही दोन शहरे मुंबई-पुणे-नाशिक या सुवर्णत्रिकोणातील महत्त्वाची शहरे आहेत. या दोन्ही शहरादरम्यान रोजाना कामानिमित्त प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे. दरम्यान, मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
विशेषतः मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाने प्रवास करणाऱ्यांसाठी ही बातमी अधिक महत्त्वाची आहे. जर तुम्हीही या महामार्गाने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास राहणार आहे. कारण की, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज एक महत्त्वाचे काम केले जाणार आहे. यामुळे हा महामार्ग आज काही काळासाठी बंद केला जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून काल एक महत्त्वाचे प्रसिद्धी पत्रक काढण्यात आले आहे. या प्रसिद्धी पत्रकानुसार मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आज अर्थातच एक ऑगस्ट 2023 रोजी काही काळासाठी बंद राहणार आहे. या मार्गावरील पुण्याकडे जाणारी वाहतूक आज दुपारी बारा वाजेपासून ते दोन वाजेपर्यंत बंद ठेवली जाणार असल्याची माहिती या प्रसिद्ध पत्रकात देण्यात आली आहे.
या महामार्गावर लोणावळा येथे ग्रॅंटी बसवण्याचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून आज केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर या महामार्गावरील पुण्याकडे जाणारी वाहतूक आज दुपारी बारा वाजेपासून ते दोन वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहणार आहे. यामुळे या महामार्गाने पुण्याकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या कालावधीमध्ये खंडाळा एक्झिट मार्ग म्हणजेच जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून प्रवास करावा लागणार आहे.
राज्य रस्ते विकास महामंडळाने या कालावधीत पुण्याकडील वाहतूक खंडाळा एक्झिट मार्ग म्हणजे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वळवली असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून पुढे वळवण येथील नाक्यावर पुन्हा पुण्याच्या दिशेने द्रुतगती मार्गावरून प्रवास करता येणे शक्य होणार आहे. निश्चितच या मार्गाने जाणाऱ्या प्रवाशांना आज काही काळ गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.