Mumbai Pune Hyperloop Train : मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. सध्या दैनंदिन कामानिमित्त मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या हि लाखोंच्या घरात पोहोचली आहे. या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करणारे प्रवासी रस्ते आणि रेल्वे मार्गाने सर्वाधिक प्रवास करत आहेत.
विशेष म्हणजे विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या स्थितीला मुंबई ते पुणे हा प्रवास विमानाने केला तर प्रवाशांना 45 मिनिटांचा म्हणजेच पाऊण तासाचा कालावधी लागत आहे. मात्र भविष्यात प्रवासाचा हा कालावधी आणखी कमी होणार आहे.
विमानापेक्षाही जलद गतीने आता रेल्वेने प्रवास करता येणार आहे. यासाठी एक नवीन प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार देशातील पहिली हायपरलुप ट्रेन आपल्या पुण्याला मिळणार आहे.
देशातील हायपरलूप ट्रेनचा हा पहिला प्रकल्प नजीकच्या भविष्यात पूर्ण होणार असून यामुळे मुंबई ते पुणे हा प्रवास फक्त आणि फक्त 25 मिनिटात पूर्ण होण्याची शक्यता आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्य शासनाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी हायपरलूप ट्रान्सपोर्टेशन सिस्टमला मान्यता दिलेली आहे.
अशा प्रकारची मान्यता देणारे महाराष्ट्र सरकार हे देशातीलच नाही तर जगातील पहिले सरकार ठरले आहे. म्हणजेच सार्वजनिक वाहतुकीसाठी हायपरलूप ट्रेनचा वापर करणारे भारत हे पहिले राष्ट्र राहणार आहे.
देशातील ही पहिली ट्रेन महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या प्रमुख शहरांना जोडणार आहे. हायपरलूप ट्रान्सपोर्टेशन सिस्टमला सरकारने मान्यता दिली असल्याने आता या प्रकल्पाच्या कामाला वेग येणार अशी आशा व्यक्त होत आहे.
मुंबई ते पुणे हे अंतर 148 किलोमीटरचे असून या मार्गावर हायपरलूप ट्रेन सुरू झाल्यास अर्ध्या तासापेक्षा कमी वेळात या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करता येणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, हाइपरलूप ट्रेन व्हॅक्यूम ट्यूब सिस्टीममधून जाणाऱ्या कॅप्सूलसारख्या हायपरलूपमधून धावणार आहे.
ही ट्रेन 1200 किमी प्रति तास या वेगाने धावण्यास सक्षम राहणार असल्याचा दावा केला जात आहे. आता आपण मुंबई ते पुणे दरम्यान सुरू होणारी देशातील पहिली हायपरलुप ट्रेन प्रकल्पाचा रूट कसा राहणार हे थोडक्यात समजून घेणार आहोत.
कसा राहणार रूट?
मिळालेल्या माहितीनुसार, व्हर्जिन ग्रुपने मुंबई-पुणे हायपरलूप ट्रेनसाठी महाराष्ट्र राज्य सरकारसोबत एक करार केला आहे. त्यानुसार ही ट्रेन लवकरच सुरू केली जाणार आहे. 2032-33 मध्ये हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे. मुंबईतील बीकेसी ते पुण्यातील वाकड पर्यंत ही Hyperloop Train चालवली जाणार आहे.
याचे भाडे हे विमानाच्या तिकिटा पेक्षा कमी राहणार आहे. विमान प्रवासाच्या निम्मे तिकीट राहणार असल्याने सर्वसामान्यांना देखील या ट्रेनने प्रवास करता येईल अशी आशा आहे. मुंबई, पुणे, चेन्नई, बंगलोर, दिल्ली, चंढीगढ या शहरांना देखील भविष्यात या ट्रेनची भेट दिली जाणार आहे.