Mumbai-Pune Expressway : राज्याची राज्य राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुणे यादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे.
खरंतर मुंबई ते पुणे आणि पुणे ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे. या दोन्ही शहरा दरम्यान दैनंदिन कामानिमित्त प्रवास करणाऱ्याची संख्या गेल्या काही दशकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर कायमच वाहतूक कोंडी होत असते. या वाहतूक कोंडीचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ वाढली असल्याने वाहतूक कोंडीची समस्या आता एक कॉमन गोष्ट बनली आहे.
दरम्यान, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आज अर्थातच 8 नोव्हेंबर रोजी काही काळ वाहतुकीसाठी बंद करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हा निर्णय झाला असून यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. हा महामार्ग आज एका तासासाठी बंद राहणार आहे.
केव्हा बंद राहणार हा मार्ग
मिळालेल्या माहितीनुसार, हा एक्सप्रेस वे वाहतूक व्यवस्थापन यंत्रणा (TMS) उपकरणे बसविण्यासाठी बंद केला जाणार आहे. हे उपकरण महामार्गावरील ढेकू गावाजवळ बसवले जाणार आहे.
एमएसआरडीसीच्या म्हणण्यानुसार, या कामासाठी आज पुणे ते मुंबई हा महामार्ग दुपारी 2 ते 2.30 वाजेपर्यंत बंद राहणार आहे आणि मुंबई ते पुणे हा महामार्ग दुपारी अडीच ते तीन वाजेपर्यंत बंद राहणार आहे. म्हणजे दोन्ही दिशेने प्रत्येकी अर्धा तासासाठी हा महामार्ग बंद केला जाणार आहे.
त्यामुळे पुणे ते मुंबई आणि मुंबई ते पुणे असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो. तथापि, दुपारी ३ नंतर महामार्ग पुन्हा वाहनांसाठी पूर्ववत सुरू केला जाणार आहे.
गॅन्ट्री बसवताना, खालापूर टोल नाका तसेच खांदा मार्गावरील पुणे वाहिनीवरील सर्व वाहतूक पूर्णपणे बंद केली जाईल. फक्त कारसाठी खोपोली एक्झिटपासून जुना हायवे शिंगरोबा घाट ते मॅजिक पॉइंट एक्स्प्रेस वेकडे वळवला जाईल. त्यामुळे प्रवाशांना हा मार्ग टाळण्याचा सल्ला दिला आहे.