Mumbai-Pune Expressway : मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास गतिमान व्हावा यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग बांधला गेला आहे. ज्यावेळी हा मार्ग विकसित करण्यात आला त्यावेळी पुढील अडीच दशकांचा विचार करण्यात आला होता.
म्हणजेच महामार्ग विकसित झाल्यानंतर अडीच दशकांपर्यंत या महामार्गावर वाहतूक कोंडी होणार नाही या दृष्टीने या महामार्गाची उभारणी करण्यात आली होती. मात्र आता हा महामार्ग विकसित करून अडीच दशकांपेक्षा अधिकचा काळ उलटला आहे. शिवाय या अडीच दशकांमध्ये या महामार्गावर वाहनांची संख्या देखील खूपच वाढली आहे.
यामुळे आता मुंबई ते पुणे हा प्रवास खूपच जटील झाला आहे. या मार्गाने प्रवास करताना प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे अपघातांची देखील संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे आता एमएसआरडीसी अर्थातच राज्य रस्ते विकास महामंडळाने या महामार्गाबाबत एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे.
आता राज्य रस्ते विकास महामंडळाकडून या मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा असा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार या महामार्गाचे विस्तारीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. हा महामार्ग आता आठ पदरी बनवला जाणार आहे.
हा महामार्ग आठ पदरी झाल्यानंतर या मार्गावरील प्रवास गतिमान होणार असून वाहतूक कोंडी पासून नागरिकांना दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे. दरम्यान राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हा मार्ग आठ पदरी बनवण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.
या महामार्गाला आता राज्य शासनाकडून मंजुरी दिली जाणार आहे. विशेष म्हणजे शासनाने मंजुरी दिल्यानंतर या मार्गाचे आठ पदरीकरणं तीन वर्षात कंप्लीट करण्याचे टार्गेट राज्य रस्ते विकास महामंडळाने ठेवले आहे. यामुळे येत्या काही वर्षात या महामार्गाचे आठ पदरीकरण होणार आणि या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे.