मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईकरांसाठी मोठी घोषणा ! ‘हा’ महत्वाकांक्षी प्रकल्प जानेवारी 2024 अखेर पूर्ण होणार, काय म्हटले मुख्यमंत्री ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai News : मुंबई शहरात आणि उपनगरात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी वाढली आहे. यामुळे राजधानी मध्ये वसलेल्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरात 4-5 किलोमीटरच्या प्रवासासाठी देखील काही तासांचा वेळ खर्च करावा लागत आहे.

यामुळे सर्वसामान्यांचा बहुमूल्य वेळ वाया जात असून वाहतूक कोंडीमुळे शहरात अपघात होण्याची देखील शक्यता असते. यामुळे मुंबई शहरासह उपनगरात वेगवेगळ्या रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत.

यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्पाचा देखील समावेश होतो. हा मुंबई महानगरपालिकेचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. दरम्यान याच प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे.

खरेतर हा प्रकल्प या चालू वर्षातच पूर्ण करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले होते. नोव्हेंबर 2023 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश शासनाच्या माध्यमातून मुंबई महापालिकेला देण्यात आले होते. मात्र या नियोजित वेळेत हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही.

यामुळे मुंबईकरांचा पुन्हा एकदा भ्रमनिरास झाला आहे. आता हा प्रकल्प नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच पूर्ण होणार असा दावा केला जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई कोस्टल रोड प्रकल्पचा पहिला टप्पा हा जानेवारी 2024 अखेर पर्यंत पूर्ण होईल अशी आश्वासन दिले आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचा मरिन लाईन्स ते वरळी हा पहिला टप्पा आहे. हाच मरीन लाईन्स ते वरळी कोस्टल रोड आता जानेवारी 2024 अखेरीस सुरू होईल अशी शक्यता आहे.

कसा आहे कोस्टल रोड प्रकल्प

मुंबई महापालिकेने हाती घेतलेल्या कोस्टल रोड प्रकल्प अंतर्गत प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंत सागरी मार्ग तयार केला जात आहे.

याची लांबी 10.58 किलोमीटर एवढी आहे. या प्रकल्पाचे काम 2018 मध्ये सुरू झाले होते. या प्रकल्पाचा पहिला टप्पा मरीन लाईन्स ते वरळी नोव्हेंबर 2023 मध्ये पूर्ण होणार होता.

मात्र नियोजित वेळेत हा टप्पा पूर्ण झाला नाही पण आता जानेवारी 2024 पर्यंत हा टप्पा पूर्ण होईल आणि त्यानंतर पुढील वर्षीच उर्वरित प्रकल्प देखील पूर्ण केला जाणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा