मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! नवीन वर्षात ‘या’ दोन रस्ते प्रकल्पांचे उद्घाटन होणार, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai News : नवीन वर्ष सुरू होण्यास अवघ्या सात ते आठ दिवसांचा काळ बाकी आहे. दरम्यान या नवीन वर्षात मुंबईकरांसाठी मुंबईमध्ये सुरू असलेल्या अनेक महत्त्वाकांशी प्रकल्पांचे लोकार्पण होणार आहे. विशेष म्हणजे नवीन वर्ष सुरू झाल्याबरोबरच हे प्रकल्प मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, जानेवारी किंवा फेब्रुवारी 2024 मध्ये मुंबई शहरातील दोन अतिशय महत्त्वाचे प्रकल्प सर्वसामान्यांसाठी सुरू केले जाणार आहेत. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि मुंबई कोस्टल रोड प्रकल्प वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच सर्वसामान्य मुंबईकरांसाठी सुरू होणार आहेत.

दरम्यान आता आपण या दोन्ही प्रकल्पांचे सध्या स्थितीला किती काम झाले आहे आणि उर्वरित काम केव्हा पूर्ण होणार आहे याबाबत सविस्तर अशी अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प : हा प्रकल्प दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पअंतर्गत शिवडी ते न्हावाशेवा दरम्यान सागरी सेतू विकसित केला जाणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पांतर्गत तयार होत असलेला 21.8 किलोमीटर लांबीचा हा ब्रिज देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी ब्रिज राहणार असल्याचा दावा केला जात आहे.

या ब्रिजला दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले आहे. खरंतर हा अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू मार्ग 25 डिसेंबर 2023 रोजी अर्थातच श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिनानिमित्त मुंबईकरांसाठी खुला होणार होता. पण आता हा प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होणार नाही हे स्पष्ट झाले आहे.

यामुळे एमटीएचएल प्रकल्प नेमका सुरू केव्हा होणार हा सवाल मुंबईकरांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. याबाबत माजी मुख्यमंत्री तथा वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे.

फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे, हा प्रकल्प 25 डिसेंबरला अर्थातच अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिनानिमित्त सुरू होणार नाही मात्र नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच हा प्रकल्प सुरू केला जाणार आहे. या प्रकल्पाची बहुतांशी कामे पूर्ण झाली आहेत केवळ रंगरंगोटी आणि इलेक्ट्रिक पोल लावण्याचे काम बाकी आहे.

जे लवकरच पूर्ण होईल. म्हणून हा प्रकल्प जानेवारी 2024 पर्यंत सर्वसामान्यांसाठी सुरू होऊ शकतो असा दावा करण्यात आला आहे. फडणवीस यांनी देखील जानेवारी अखेरपर्यंत हा प्रकल्प सर्वसामान्यांसाठी सुरु व्हावा यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले आहे.

मुंबई कोस्टल रोड : मुंबई कोस्टल रोड हा देखील मुंबईमधील एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा प्रकल्प दक्षिण मुंबईतील एक महत्वाचा आहे. या प्रकल्पांतर्गत मरीन ड्राईव्ह ते वांद्रे वरळी सी लिंक द्वारे थेट कांदिवलीपर्यंत कोस्टल रोड निर्माण केला जाणार आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा हा नवीन वर्षात अगदी सुरुवातीला सुरू होऊ शकतो असा दावा काही मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे.

या प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजे प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वांद्रे वरळी सी लिंक हा 10.58 किमीचा 4 लेनचा मार्ग आहे. यामध्ये भूमिगत मार्ग, 3 इंटर चेंज, काही उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. आतापर्यंत या प्रकल्पाचे 85% एवढे काम पूर्ण झाले असून याचा पहिला टप्पा हा नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच सर्वसामान्यांसाठी सुरू होऊ शकतो अशी माहिती प्रतिष्ठित मीडिया रिपोर्टमधून समोर आली आहे. 

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा