Mumbai News : आर्थिक वर्ष 2023-24 संपण्यासाठी आता अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या दोन दिवसात नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच मुंबईकरांसाठी एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही बातमी मुंबई उपनगरातून दक्षिण मुंबईमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी अधिक महत्त्वाची आणि चिंताजनक राहणार आहे.
आता नवीन वर्षात मुंबईकरांना प्रवास करतांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता वांद्रे-वरळी सी लिंकने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिकचा टोल भरावा लागणार आहे.
खरेतर वांद्रे वरळी सी लिंकने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूप अधिक आहे. या प्रकल्पामुळे मुंबईच्या उपनगरातून दक्षिण मुंबईकडे प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे.
या मार्गामुळे प्रवाशांचा प्रवास हा आधीच्या तुलनेत जलद झाला आहे. पण आता मुंबई उपनगरातून दक्षिण मुंबईमध्ये जाणाऱ्या वाहनधारकांना नवीन आर्थिक वर्षात अधिकचा खिसा खाली करावा लागणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, राज्य रस्ते विकास महामंडळाने अर्थातच एम एस आर डी सी ने वांद्रे वरळी सी लिंक वरील टोलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून हे नवीन दर पुढील तीन वर्षांसाठी कायम राहणार आहे.
दरम्यान, आता आपण राज्य रस्ते विकास महामंडळाने या मार्गावर प्रवास करण्यासाठी नवीन आर्थिक वर्षात किती टोल आकारण्याचा निर्णय घेतलेला आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. म्हणजेच टोलच्या दरात किती वाढ झाली आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत.
नवीन टोल दर कसे आहेत ?
मिळालेल्या माहितीनुसार नवीन आर्थिक वर्षात म्हणजेच सोमवारपासून कार, जीप, टॅक्सीला एकल प्रवासासाठी शंभर रुपये एवढा टोल भरावा लागणार आहे. सध्या हा रेट 85 रुपये एवढा आहे. तसेच मिनी बस आणि त्या प्रकारातील वाहनांना सोमवारपासून 160 रुपये एवढा टोल भरावा लागणार आहे.
सध्या हा रेट 130 रुपये एवढा आहे. म्हणजेच यामध्ये तीस रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतलेला आहे. शिवाय ट्रक, बस अशा मोठ्या वाहनांना आता 210 रुपये एवढा टोल भरावा लागणार आहे.
सध्या हा रेट 170 रुपये एवढा आहे. म्हणजेच यामध्ये देखील चाळीस रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दरम्यान हे टोलचे नवीन दर सोमवारपासून लागू होतील आणि 31 मार्च 2027 पर्यंत लागू राहणार आहेत.
तथापि आगाऊ पन्नास कुपन खरेदी करणाऱ्यांना एकूण टोलच्या रकमेवर दहा टक्के आणि आगाऊ 100 कुपन खरेदी करणाऱ्यांना एकूण टोलचा रकमेवर 20% एवढी सवलत दिली जाणार आहे. याशिवाय या मार्गाच्या टोल साठी मासिक पासची सुविधा देखील उपलब्ध आहे.