Mumbai News : मुंबई आणि ठाण्यातील नागरिकांसाठी एक मोठी बातमी आहे. मुंबई ते ठाणे आणि ठाणे ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही बातमी खास राहणार आहे.
खरंतर, या दोन्ही शहरादरम्यान रस्तेमार्गाने प्रवास करण्यासाठी पूर्व द्रुतगती मार्गाने जावे लागते. मात्र हा रस्ता जागो-जागी खूपच खराब झाला आहे.
यामुळे या रस्त्याने प्रवास करताना नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्त्याची चाळण झाली असल्याने सर्वसामान्यांचे हाल होत असून प्रवासासाठी अधिकचा वेळ खर्च करावा लागत आहे.
रस्ता खराब असल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. शिवाय यामुळे अपघात होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.
हेच कारण आहे की आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थातच एम एम आर डी ए च्या माध्यमातून या मार्गाची दुरुस्ती केली जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एम एम आर डी ए या मार्गाचा ठाणे ते मुलुंड दरम्यानचा रस्ता दुरुस्त करणार आहे. या मार्गाचा जवळपास पाच किलोमीटरचा भाग हा दुरुस्त केला जाणार आहे.
विशेष म्हणजे यासाठी निविदा देखील जाहीर करण्यात आली आहे. यानुसार आता ठाण्यातील माजिवाडा ते मुलुंड जुना जकात नाक्यादरम्यानच्या मार्गाची दुरुस्ती केली जाणार आहे.
माजिवाडा येथील गोल्डन डायस जंक्शन ते मुलुंड येथील जुना जकात नाका या दरम्यान चा रस्ता खूपच खराब झाला असल्याने ही दुरुस्ती केली जाणार आहे. यासाठी निविदा काढण्यात आली आहे.
आता या कामासाठी निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून कंत्राटदाराची नियुक्ती होणार आहे. कंत्राटदाराची नियुक्ती झाल्यानंतर अवघ्या एका वर्षाच्या काळात या मार्गाच्या दुरुस्तीचे काम करणे प्रस्तावित आहे.
यासाठी दोन कोटी 68 लाख 16 हजार 164 रुपयांचा खर्च होणार अशी माहिती समोर आली आहे. निश्चितच हा मार्ग दुरुस्त झाल्यास मुंबई ते ठाणे आणि ठाणे ते मुंबई हा प्रवास गतिमान होणार आहे. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.