मुंबईकरांसाठी गोड बातमी ! मुंबई ते दुबईचा प्रवास होणार फक्त 2 तासात, समुद्राखालून तयार होणार नवीन रेल्वे मार्ग, कसा असेल रूट ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai News : मुंबई आणि दुबई ही दोन्ही शहरे जगातील महत्त्वाची शहरे आहेत. मुंबई तर भारताची आर्थिक राजधानीच आहे. दरम्यान मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि संपूर्ण देशासाठी एक अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मुंबई आणि संयुक्त अरब अमिराती येथील दुबई दरम्यानचा प्रवास भविष्यात फक्त दोन तासात पूर्ण करता येणार आहे.

विशेष म्हणजे हा प्रवास हवाई मार्गाने नव्हे तर लोहमार्गाने दोन तासात करता येणे शक्य होणार आहे. म्हणजेच आता मुंबईहून दुबई रेल्वेने केवळ दोन तासात जाता येणे शक्य होणार आहे. यासाठी थेट रेल्वे मार्ग तयार केला जाणार आहे. खरंतर, भारताचे संयुक्त अरब अमिराती या देशासोबत खूपच चांगले संबंध आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत. या दोन्ही उभय देशांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापार केला जात आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

भारत संयुक्त अरब अमिराती मधून मोठ्या प्रमाणात तेलाची आयात करत आहे. शिवाय संयुक्त अरब अमिराती देखील आपल्या देशातून मोठ्या प्रमाणात कृषी उत्पादनांची आयात करत आहे. एकंदरीत व्यापाराच्या दृष्टिकोनातून या दोन्ही उभय देशांमधील संबंध हे खूपच महत्त्वाचे आहेत. शिवाय दोन्ही देशांमध्ये भावनिक संबंध देखील खूपच घट्ट आहेत. तसेच भविष्यात या दोन्ही देशांमधील व्यापार आणखी वाढणार आहे.

हेच कारण आहे की, या दोन्ही देशांदरम्यानचा व्यापार, पर्यटन, आणि शैक्षणिक क्षेत्राला चालना देण्यासाठी मुंबई ते संयुक्त अरब अमिराती म्हणजे UAE दरम्यान रेल्वे मार्ग विकसित केला जाणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. हा रेल्वे मार्ग मुंबई ते युएईमधील दुबई दरम्यान विकसित होणार आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण रेल्वे मार्ग समुद्राखालून तयार केला जाणार आहे. म्हणजे समुद्राच्या पाण्यातून रेल्वे मार्ग तयार होणार आहे.

यामुळे मुंबई ते दुबई हा प्रवास फक्त दोन तासात पूर्ण होऊ शकतो असा दावा देखील होत आहे. या प्रकल्पांतर्गत जवळपास दोन हजार किलोमीटर लांबीचे रेल्वेचे नेटवर्क तयार केले जाणार आहे. या प्रकल्पाचा संपूर्ण प्रस्ताव हा संयुक्त अरब अमिरातील या देशानेच ठेवला आहे. या प्रकल्पावर संयुक्त अरब अमिराती मधील ॲडव्हायझर ब्युरो लिमिटेड काम करणार असल्याचे सांगितले जात आहे.

विशेष म्हणजे या प्रोजेक्टबाबत ॲडव्हायझर ब्युरो लिमिटेड च्या संचालकांनीच स्वतः माहिती दिली आहे. यामुळे या प्रकल्पावर भविष्यात वेगाने काम सुरू होईल आणि मुंबई ते दुबई चा प्रवास फक्त दोन तासात पूर्ण होईल असा आशावाद आता व्यक्त होत आहे.