मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! सीएसएमटी रेल्वे स्थानक ते मेट्रोस्थानक दरम्यान विकसित होणार भुयारी मार्ग, कसा असेल मार्ग ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai News : शासनाच्या माध्यमातून राज्यासह संपूर्ण देशभरातील रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यात देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानीत म्हणजे मुंबई शहरात देखील दळणवळण व्यवस्था, वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

शहरात आणि उपनगरात गेल्या काही वर्षांपासून मेट्रोचे जाळे विकसित करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

शहरातील काही महत्त्वाच्या मार्गावर मेट्रो सुरु झाली आहे तर काही मार्गांवरील मेट्रोचे काम सुरू आहे. मेट्रो 3 चे काम देखील शहरात जोरात सुरु आहे.

या मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा हा डिसेंबर 2023 अखेर पर्यंत पूर्ण होईल असा आशावाद व्यक्त होत आहे. या मेट्रो मार्ग अंतर्गत आरे ते कफ परेड असा मार्ग विकसित होणार आहे.

यातील आरे ते बीकेसी हा मार्गाचा पहिला टप्पा राहणार आहे आणि हा पहिला टप्पा डिसेंबर २०२३ ला सुरू होणार अशी आशा आहे.

तूर्तास मात्र हा मेट्रो मार्ग केव्हा सुरू होणार याबाबत मेट्रो प्रशासनाच्या माध्यमातून फिक्स तारीख समोर आलेली नाही. पण डिसेंबर अखेरपर्यंत या मार्गाचा पहिला टप्पा सुरू होईल अशी आशा आहे.

तसेच दुसरा टप्पा हा बीकेसी दक्षिण ते कफ परेड असा राहणार आहे. हा दुसरा टप्पा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर लगेचच सुरू होईल असा आशावाद आहे.

एका मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार या मेट्रो मार्गाचा दुसरा टप्पा डिसेंबर २०२४ मध्ये सुरू होणाऱ आहे. दरम्यान या दुसऱ्या टप्प्यात सीएसएमटी मेट्रो स्थानक सुद्धा आहे.

आता या मेट्रो स्थानातून थेट सीएसएमटी स्थानकावर जाता यावे यासाठी नव्याने भुयारी मार्ग तयार केला जाणार आहे. हा प्रस्तावित भुयारी मार्ग सीएसएमटीच्या फलाट क्रमांक १ पासून सुरू होणार आहे.

पुढे हा मार्ग हिमालय पूल, किल्ला कोर्ट, प्रेस क्लबच्या समोरून आझाद मैदानाच्या दिशेने जाईल, अशी माहिती समोर आली आहे. ह्या पुलांची लांबी ३५० मीटर आणि रुंदी १८ मीटर एवढी राहणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा