Mumbai News : दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी उन्हाळी सुट्ट्या लागताच विविध रेल्वे मार्गावरील गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे. उन्हाळी सुट्ट्या लागल्याने अनेक जण आता आपल्या मूळ गावी परतत आहेत. तसेच काही जण पर्यटनासाठी जात आहेत. यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे.
दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून विविध रेल्वे मार्गांवर विशेष गाड्या सोडल्या जात आहेत. कोकण रेल्वे, मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे विभागाने आतापर्यंत अनेक विशेष एक्सप्रेस गाड्यांची घोषणा केली आहे.
दरम्यान पश्चिम रेल्वेने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. या नवीन निर्णयानुसार, राज्यातील मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावरून उत्तरेकडील राज्यांसाठी अर्थातच युपी, बिहारसाठी विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे.
यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईतून युपी बिहारला जाणाऱ्या प्रवाशांना पश्चिम रेल्वेच्या या निर्णयाचा मोठा फायदा होईल असे बोलले जात आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वे मुंबई सेंट्रल ते काठगोदाम आणि मुंबई सेंट्रल ते कटिहार या दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवणार आहे.
अशा परिस्थितीत आज आपण या दोन्ही विशेष एक्सप्रेस ट्रेन चे वेळापत्रक कसे राहणार यासंदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मुंबई सेंट्रल ते काठगोदाम विशेष एक्सप्रेस ट्रेनच वेळापत्रक कसं राहणार ?
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई सेंट्रल-काठगोदाम विशेष एक्सप्रेस ट्रेन (गाडी क्रमांक ०९०७५) 24 एप्रिल ते 26 जून दरम्यान चालवली जाणार आहे. ही गाडी या कालावधीत मुंबई सेंट्रल येथून दर बुधवारी सकाळी ११.०० वाजता निघेल आणि काठगोदामला दुसऱ्या दिवशी १४.३० वाजता पोहोचेल.
तसेच गाडी क्रमांक ०९०७६ काठगोदाम – मुंबई सेंट्रल सुपरफास्ट स्पेशल ट्रेन 25 एप्रिल ते 27 जून या कालावधीत चालवली जाणार आहे. या कालावधीत ही गाडी काठगोदाम येथून दर गुरुवारी १७.३० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी २०.५५ वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचणार अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.
मुंबई सेंट्रल ते कटिहार विशेष एक्सप्रेस ट्रेनच वेळापत्रक कसे राहणार
ट्रेन क्रमांक ०९१८९ मुंबई सेंट्रल-कटिहार विशेष एक्सप्रेस ट्रेन 20 एप्रिल ते 29 जून या कालावधीत चालवली जाणार आहे. या कालावधीत ही गाडी मुंबई सेंट्रल येथून दर शनिवारी सकाळी १०.३० वाजता सोडली जाणार आहे आणि सोमवारी ०७.३० वाजता कटिहारला पोहोचणार आहे.
तसेच ट्रेन क्रमांक 09190 कटिहार-मुंबई सेंट्रल स्पेशल ट्रेन 23 एप्रिल ते दोन जुलै या दरम्यान चालवली जाणार आहे. कालावधीत ही गाडी कटिहार येथून दर मंगळवारी 00.15 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 18.40 वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचणार आहे.