राजधानी मुंबईच्या वैभवात भर पडणार ! मरीन ड्राइव्हवर मुंबईकरांसाठी तयार होणार ‘या’ आंतरराष्ट्रीय सुविधा, पहा सरकारचा प्लॅन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai News : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी आहे. सोबतच मुंबई हे एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ देखील आहे. औद्योगिक दृष्ट्या अतिमहत्त्वाच्या अशा या शहराला खूपच मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. मुंबईला लाभलेल्या या समुद्रकिनाऱ्याची भुरळ केवळ देशवासीयांनाच पडली आहे असे नाही तर विदेशी पर्यटक देखील मुंबईच्या समुद्रकिनाऱ्याची झलक पाहण्यासाठी लाखोच्या संख्येने मुंबईमध्ये दाखल होत असतात.

दरम्यान आता मुंबईमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी आणि मुंबईकरांसाठी एक अति महत्त्वाचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री महोदय यांनी मरीन ड्राईव्ह परिसरात देश तसेच विदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी तसेच मुंबईकरांसाठी आवश्यक सोयी सुविधा विकसित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! ‘या’ दोन शहरात लवकरच सुरु होणार वंदे मेट्रो, 1 रुपये प्रति किलोमीटर राहणार भाडे, पहा….

आम्ही आपणास सांगू इच्छितो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी म्हणजे 1 मे ला अर्थातच महाराष्ट्र दिनी मरिन ड्राइव्ह परिसरातील विविध सुविधा, स्वच्छता व सुशोभीकरण कामांचा आढावा घेणारा पाहणी दौरा केला होता. यावेळी मुख्यमंत्री महोदय यांना पालिका आयुक्त इकबाल सिंग यांनी या परिसरात पालिकेच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या कामांची, तसेच उपाययोजनांची माहिती दिली आहे.

यावेळी मुख्यमंत्री महोदय यांनी या परिसरात भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी तसेच या ठिकाणी येणाऱ्या मुंबईकरांसाठी सोयी-सुविधा, त्यांना विरंगुळासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे, अशा सूचना पालिका प्रशासनाला दिल्या आहेत. मरिन ड्राइव्ह परिसरातील सी फेसिंग इमारतींना विशिष्ट कलर दिला जावा, आंतरराष्ट्रीय दर्जाचा लेझर शो मरीन ड्राईव्ह परिसरात सुरू व्हावा, अशा सूचना यावेळी शिंदे यांनी केल्या आहेत.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना स्वस्तात मिळणार डीएपी, वाचा सविस्तर

तसेच सध्या सुरू असलेल्या सुशोभीकरण कामांच्या आणि स्वच्छतेच्या अनुषंगानेही त्यांनी काही महत्त्वाच्या सूचना पालिका प्रशासनाला दिल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच मरीन ड्राइवर येणाऱ्या पर्यटकांसाठी आणि मुंबईकरांसाठी एकूण ५३ मीटर लांब व ५ मीटर रुंद असा सी साइड प्लाझा विकसित केला जाणार आहे जेणेकरून मरीन ड्राइव वरून सुंदर असे समुद्राचे दर्शन पर्यटकांना करता येऊ शकते.

यासोबतच मरीन ड्राईव्ह परिसरात प्रत्येकी एका किलोमीटरवर सुंदर असे स्वच्छतागृह तयार केले जाणार आहे. अशी माहिती यावेळी पालिका आयुक्तांनी दिली आहे. एकंदरीत आगामी काही दिवसात मरीन ड्राईव्ह चे रूपडे पालटणार आहे. यामुळे मुंबईच्या वैभवात भर पडेल आणि मुंबईकरांना तसेच मुंबई फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना मुंबई आणखीनच आकर्षित करेल असा आशावाद या निमित्ताने व्यक्त होत आहे.

हे पण वाचा :- मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ! ‘या’ एक्सप्रेस ट्रेनला आता अतिरिक्त डबे जोडले जाणार, पहा…..

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा