Mumbai News : गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई शहरात आणि उपनगरात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पाची कामे पूर्ण झाली आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी मुंबईकरांना मुंबई ते नवी मुंबईला जोडणारा एक सागरी सेतू मिळालेला आहे. शिवडी ते न्हावा शेवा दरम्यान विकसित करण्यात आलेला देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू नुकत्याच काही दिवसांपूर्वी सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आला आहे.
या सागरी सेतूला माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी जी यांचे नाव देण्यात आले आहे. दरम्यान हा अटल सेतू विकसित झाल्यामुळे मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास जलद झाला आहे विशेष म्हणजे या सेतूमुळे मुंबई ते पुणे हा प्रवास देखील जलद होत आहे.
तरीही मुंबई ते पुणे हा प्रवास जर करायचं म्हटलं तर अटल सेतूच्या पुढे मुंबई-पुणे एक्सप्रेस वे पर्यंत जाण्यासाठी प्रवाशांना थोड्याशा अडचणींचा सामना करावा लागतोय.
शिवाय अटल सेतूच्या पुढे भविष्यात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता देखील नाकारून चालणार नाही. पण आता ही अडचण देखील दूर होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अटल सेतूच्या पुढील टप्प्याचे काम आता सुरू होणार आहे. अटल सेतू जिथे संपतो त्या चिर्लेपासून ते मुंबई पुणे एक्सप्रेस वे पर्यंत एक नवीन मार्ग तयार केला जाणार आहे.
विशेष म्हणजे या मार्गाच्या कामाचा मार्ग देखील मोकळा झाला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने या कामासाठी निवडल्या गेलेल्या कंत्राटदाराला देकार पत्र देऊ केले आहे. म्हणजेच आता लवकरच हे काम सुरू होऊ शकणार आहे.
याचे काम गावर कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. दरम्यान या कन्स्ट्रक्शन कंपनीकडून आता लवकरच या कामाला सुरुवात होईल अशी आशा व्यक्त होत आहे. प्रत्यक्षात या प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण करणे देखील आवश्यक राहणार आहे.
कारण की कोकण आणि पुणे येथून प्रवासी मुंबईत येताना याच मार्गाने येतात. दरम्यान आता आपण या मार्गाचे बांधकाम कसे असणार याचा रूट कसा असेल हे पाहणार आहोत.
या प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय महामार्ग 348 वर चिर्ले ते गव्हाण फाटा असा 4.50 किलोमीटर लांबीचा सहा पदरी उन्नत रस्ता बिल्ड अप केला जाणार आहे. यानंतर पुढे पळस्पे ते मुंबई पुणे एक्सप्रेस वे पर्यंत दोन किलोमीटर लांबीचा 6 पदरी उन्नत रस्ता तयार होणार आहे.
या मार्गावर दोन रेल्वे पूल आणि दोन इंटरचेंज म्हणजेच अंतरबदल राहणार आहेत. या मार्गासाठी 1420 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. पण या प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे आणि पुणे ते मुंबई हा प्रवास खूपच सुपरफास्ट होईल अशी आशा आहे.