MMRDA राजधानी मुंबईत ‘या’ ठिकाणी विकसित करणार नवा भुयारी मार्ग ! कसा असणार रूट ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai News : राजधानी मुंबई आणि उपनगरांत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने लोकसंख्येचा आलेख वाढत चालला आहे. यामुळे मुंबईसह उपनगरात विविध रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहे. यामध्ये कोस्टल रोड प्रकल्पाचा देखील समावेश होतो.

कोस्टल रोड प्रकल्पांमुळे शहरातील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी कमी होईल असा अंदाज आहे. खरंतर 2023 अखेरपर्यंत या प्रकल्पाचा पहिला टप्पा सर्वसामान्यांसाठी सुरू होणार असा दावा करण्यात आला होता.

पण, या प्रकल्पाचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार नाही असे स्पष्ट झाले आहे. यामुळे कोस्टल रोड प्रकल्पाचा पहिला टप्पा नवीन वर्षात अर्थातच जानेवारी 2024 तारखेपर्यंत सुरू होऊ शकतो अशी शक्यता आहे.

अशातच आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून आणखी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने आता शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ईस्टर्न फ्री वे आणि कोस्टल रोडला जोडणारा नवा भुयारी मार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

काल अर्थातच 12 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ही बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

यात मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्राधिकरणाचे आयुक्त संजय मुखर्जी, गृहनिर्माण विभागाचे प्रमुख सचिव वलसा नायर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

याशिवाय, या बैठकीत घोडबंदर सेवा रस्त्याचे काँक्रिटीकरण, रायलादेवी तलावाचे सुशोभीकरण, वालधुनी नदीला समांतर असा 24 मीटर रुंदीचा रस्ता अशा विविध प्रकल्पांना कालच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे.

निश्चितच ईस्टर्न फ्री वे आणि कोस्टल रोडला जोडणारा नवा भुयारी मार्ग तयार झाला तर शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा