आनंदाची बातमी ! मुंबईहुन ‘या’ शहरादरम्यानचा प्रवास होणार गतिमान, 926 कोटी रुपयांचा दुहेरी बोगदा लवकरच होणार सुरू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai News : गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात पायाभूत सुविधा विकसित करण्यावर शासनाने विशेष जोर दिला आहे. पायाभूत सुविधेत प्रामुख्याने रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक सुधारण्यावर शासनाचा अधिक जोर आहे. खरंतर कोणत्याही राज्याच्या किंवा राष्ट्राच्या विकासात तेथील दळणवळण व्यवस्था महत्त्वाची भूमिका निभावत असते.

हेच कारण आहे की शासनाने देशातील रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुधारण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. रस्ते वाहतूक मजबूत बनवण्यासाठी संपूर्ण देशभरात विविध रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये मुंबई ते सातारा हा प्रवास वेगवान बनवण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या दुहेरी बोगदा प्रकल्पाचा देखील समावेश होतो.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने म्हणजे एनएचएआयकडून खंबाटकी पोहच मार्गासह दुहेरी बोगदा प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान याच प्रकल्पाबाबत आता एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी माहिती समोर आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार या प्रकल्पाचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू असून जून २०२४ मध्ये हे काम पूर्ण होणार आहे.

म्हणजेच हा दुहेरी बोगदा जून 2024 पासून सर्वसामान्यांसाठी सुरू होऊ शकतो असा अंदाज आहे. खरेतर खंबाटकी घाटातून सध्या स्थितीला दररोज ५५ हजार वाहने धावत आहेत. या विक्रमी वाहन संख्येमुळे या घाटात अनेकदा वाहतूक कोंडी होते.

परिणामी या घाटातून प्रवास करणाऱ्या अनेकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. विशेष म्हणजे दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहनांच्या संख्येमुळे या घाटात आगामी काही वर्षात वाहतूक कोंडीची समस्या आणखी जटील होण्याची शक्यता आहे.

सध्या या घाटातून प्रवास करण्यासाठी किमान ४५ मिनिटे लागत आहेत. साताऱ्यावरून पुणे-मुंबईला येण्यासाठी खंबाटकी घाटात सध्या दोन मार्गिकांचा एक बोगदा आहे. येथून पुण्याच्या दिशेने एकेरी वाहतूक होते. पण तरीही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आणि यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जात आहे.

हेच कारण आहे की खंबाटकी घाट येथे पोहच मार्गासह दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत दुहेरी बोगदा आणि पोहोच रस्ता तयार केला जात आहे. या ६.४६ किमीच्या प्रकल्पाच्या कामास २०१८ मध्ये सुरुवात झाली असून आता या प्रकल्पाचे बहुतांशी काम पूर्ण होत आले आहे.

यासाठी ९२६ कोटी रुपये एवढा खर्च लागणार आहे. हा प्रकल्प पुणे-सातारा महामार्गावरील वेळे येथून सुरू होतो आणि खंडाळा येथे संपतो. या दुहेरी बोगदा प्रकल्प अंतर्गत विकसित होत असलेल्या बोगद्यात प्रत्येकी तीन मार्गिकां विकसित केल्या जात आहेत.

या बोगद्यांची रुंदी १६.१६ मीटर असून उंची ९.३१ मीटर एवढी आहे. दरम्यान या प्रकल्पाअंतर्गत विकसित होत असलेल्या बोगद्यांचे आणि पोहोच रस्त्यांचे 60 टक्के एवढे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित 40 टक्के काम देखील जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

विशेष म्हणजे हे काम जून 2024 मध्ये पूर्ण होईल असा अंदाज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या काही अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. त्यामुळे जून 2024 पासून हा प्रकल्प सर्वसामान्यांसाठी सुरू होईल आणि यामुळे मुंबई ते सातारा आणि पुणे ते सातारा हा प्रवास गतिमान होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा