Mumbai News : राजधानी मुंबई आणि उपनगरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याचे प्रयत्न सध्या जोरात सुरू आहेत. शहरातील आणि उपनगरातील खाजगी वाहनांची वाहतूक कमी करून शहरातील प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी लोकांनी अधिका-अधिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा यासाठी शहरात आणि उपनगरात वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत.
वेगवेगळ्या मार्गावर बसेस चालवल्या जात आहेत. मेट्रोचे जाळे देखील विस्तारले जात आहे. याच पार्श्वभूमीवर नुकत्याच काही दिवसांपूर्वी मुंबई शहरात इलेक्ट्रिक एसी बस देखील सुरू करण्यात आली आहे. अशातच आता या इलेक्ट्रिक एसी बस बाबत एक महत्त्वाचे अपडेट हाती आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बेस्ट लवकरच मुंबई उपनगरात देखील मुंबई प्रमाणेच इलेक्ट्रिक एसी बस सुरू करणार आहे बेस्टकडून लवकरच मुंबई उपनगरात इलेक्ट्रिक एसी बस चालवली जाणार आहे.
या अनुषंगाने बेस्टने पूर्वतयारी देखील सुरु केली आहे. यामुळे आता आपण मुंबई उपनगरातील कोणत्या मार्गावर बेस्टची डबल डेकर इलेक्ट्रिक एसी बस सुरू होणार, ही सेवा केव्हा सुरू होणार याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मुंबई उपनगरातील कोणत्या मार्गावर धावणारा डबल डेकर इलेक्ट्रिसिटी बस
एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून मिळालेल्या माहितीनुसार, बेस्ट कडून मुंबई उपनगरात इलेक्ट्रिक एसी बस चालवली जाणार आहे. ही बस मुंबई उपनगरात या चालू महिन्यात किंवा पुढल्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर महिन्यापर्यंत सुरू होऊ शकते अशी माहिती समोर येत आहे.
सुरुवातीला मुंबई उपनगरातील वर्दळीच्या ठिकाणी ही बस सुरू करण्याचे बेस्टचे नियोजन आहे. वांद्रे कुर्ला संकुल म्हणजेच बीकेसी आणि सांताक्रुज येथील प्रवाशांसाठी ही बस लवकरच सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या मुंबई शहरात एकूण 16 इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बस धावत आहेत.
आगामी काळात बेस्टच्या ताफ्यात आणखी 8 एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बस समाविष्ट होणार आहेत. सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात या बसेस बेस्ट कडे येणार आहेत. त्यावेळी मुंबई उपनगरात बेस्टची इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बसची सुरुवात होणार आहे. सध्या मुंबई शहरात सुरू असलेल्या या बसेस शहराच्या दक्षिण भागात सुरू आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, फोर्ट, चर्चगेट, नरिमन पॉईंट आणि कफ परेड दक्षिण मुंबईच्या भागात सध्या ही गाडी सुरू आहे. पण येत्या काळात मुंबई उपनगरातील बीकेसी मध्ये ही गाडी चालवली जाणार आहे. या भागात दररोज लाखो प्रवासी ये-जा करतात यामुळे या ठिकाणी जर ही गाडी सुरू झाली तर बेस्टला चांगले उत्पन्न मिळणार आहे.
कुर्ला, बीकेसी वांद्रे स्टेशन पर्यंत ही बस चालवण्याचे नियोजन आहे. सध्या कुर्ला ते सांताक्रुझ या मार्गावर एअर इंडिया कॉलनी, मुंबई विद्यापीठमार्गे दोन बसेस चालवल्या जात आहेत. पण या दोन बसेस ऐवजी एसी डबलडेकर बस सुरु करण्याविषयी सध्या प्रशासन स्तरावर विचार सुरू आहे.
याबाबत बेस्टच्या एका अधिकाऱ्याने येत्या महिन्याभरात बीकेसीत एसी डबल डेकर बस सुरू करू आणि त्यानंतर ही गाडी सांताक्रुज मध्ये सुरू करू अशी माहिती दिली आहे. दक्षिण मुंबईमध्ये ज्याप्रमाणे या गाडीमुळे प्रवाशांचा प्रवास सुलभ झाला आहे त्याचप्रमाणे मुंबई उपनगरातील प्रवाशांचा प्रवास देखील या गाडीमुळे सुलभ होईल असा आशावाद व्यक्त होत आहे. या गाडीमुळे बेस्टला देखील चांगले उत्पन्न मिळण्याची आशा आहे.