मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ शहरासाठी थेट सुरू होणार विमानसेवा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai News : मुंबई शहरातील नागरिकांसाठी एक मोठी बातमी आहे. ती म्हणजे भारताची आर्थिक राजधानी मुंबईला आता मध्ये पूर्वेतील देशांना जाणे सोपे होणार आहे. मुंबईहुन लवकरच मध्यपूर्वेतील कतार या देशा करीता आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू होणार आहे.

खरे तर कतारमधील दोहा हे मुंबई प्रमाणेच मध्यपूर्वेतील एक प्रमुख व्यापारी केंद्र आहे. या शहराची मध्यपूर्वेतील देशाची आर्थिक राजधानी अशी अलिखित ओळख आहे.

दरम्यान या दोन्ही व्यापारी शहरादरम्यान आता थेट विमानसेवा सुरू होणार आहे. यामुळे व्यापाराची देवाणघेवाण आणि उद्योग क्षेत्राला याचा मोठा फायदा होणार आहे.

मुंबईहून दोहाला प्रवास करणाऱ्यांची संख्या विशेष उल्लेखनीय आहे. त्यामुळे ही थेट विमान सेवा सुरु केली जाणार आहे.

येत्या 12 दिवसात अर्थातच 15 डिसेंबर 2023 रोजी मुंबई ते दोहा अशी विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

ही विमान सेवा विस्तारा एअरलाइन्स कंपनीच्या माध्यमातून पुरवली जाणार आहे. कंपनीची या मार्गावर थेट पहिलीच विमानसेवा राहणार आहे. या मार्गावर कंपनीचे विमान चार वेळा उड्डाणं भरणार आहे.

विशेष म्हणजे विस्तार एअरलाइन्स कंपनीने यासाठी कंपनीच्या ताफ्यातील एअरबस कंपनीचे ए 321 निओ हे अद्ययावत विमान रुजू करण्याचा निर्णय घेतला आहे.

विस्तारा एअरलाइन्सने, या थेट विमानसेवेमुळे (Mumbai To Doha Flight) उभय शहरामधील व्यापार-उद्दीमाला चालना मिळणार असा आशावाद व्यक्त केला आहे.

उभय राष्ट्रांमधील नागरिकांना यामुळे दोन्ही शहरांदरम्यान जलद आणि सुरक्षित प्रवास करता येणार आहे. विस्तारा एअरलाइन्स कंपनीने घेतलेल्या निर्णयाचा उद्योग क्षेत्रातून स्वागत करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, ही मध्य पूर्वेतील देशासाठी सुरू झालेली विमानसेवा विस्तारा एअरलाइन्स कंपनीसाठी एक स्पेशल माईलस्टोन देखील सिद्ध होणार आहे. कारण की, ही विमानसेवा (Mumbai To Katar Flight) एअरलाइन्स कंपनीची 50 व्या मार्गांवरील विमान सेवा ठरणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा