Mumbai News : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई शहराचा झपाट्याने विकास होत आहे. मुंबई शहरातील लोकसंख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण येत आहे.
यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. दरम्यान, शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत.
अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई, नवी मुंबई आणि उपनगरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून एक मोठी घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री महोदय यांनी मुंबई आणि नवी मुंबई या दोन शहरादरम्यान वसलेल्या पनवेल, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि भिवंडी या शहरांना नवी मुंबई सोबत जोडण्यासाठी एक नवीन रिंग रोड तयार केला जाईल अशी घोषणा केली आहे.
हैदराबाद आणि अहमदाबाद या शहरांच्या धर्तीवर हा नवीन रिंग रोड तयार होणार आहे. हा एक्सेस कंट्रोल रिंग रोड राहील. विशेष म्हणजे याचा डीपीआर एमएमआरडीए लवकरच तयार करणार अशी घोषणा देखील मुख्यमंत्री महोदय यांनी केली आहे.
आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील रस्ते विकास प्रकल्पात उप बाधित झालेल्या नागरिकांना बीएसयूपी योजनेतील घराच्या चाव्यांचे वाटप मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सोमवारी अत्रे रंगमंदिरात झाले.
याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री महोदय यांनी ही मोठी घोषणा केली आहे. खरे तर, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील भाषण केले.
खा. शिंदे यांनी भाषणात ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, पनवेल आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या रिंगरोडची आवश्यकता असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. तसेच या रिंग रोडला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी द्यावी, अशी मागणीही केली.
विशेष बाब म्हणजे खासदार शिंदे यांची ही मागणी मान्य करीत मुख्यमंत्री शिंदे यांनी या रिंगरोडकरिता एमएमआरडीएच्या माध्यमातून डीपीआर तयार होणार अशी घोषणाही केली.
यामुळे भविष्यात ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, पनवेल आणि नवी मुंबई दरम्यानचा प्रवास आणखी सोयीचा आणि सुलभ होईल अशी आशा व्यक्त होत आहे.