ये हुई ना बात ! मुंबईच्या ‘या’ भागातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तयार केला जाणार तब्बल 90 फुटी रस्ता ! मार्ग कसा असणार ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai News : मुंबई शहरात आणि उपनगरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढतच आहे. यामुळे देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई मधील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. राजधानी मुंबई बॉलीवूडनगरी, मायानगरी, स्वप्ननगरी अशा कित्येक नावाने ओळखली जाते.

अलीकडे मात्र मुंबई वाहतूक कोंडीसाठीही विशेष ओळखली जाऊ लागली आहे. शहरात मुंग्यांसारख्या वाहनांच्या रांगा पाहायला मिळतात. यामुळे अपघातांची संख्या देखील वाढत आहे. परिणामी शहरातील आणि उपनगरातील ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.

यामध्ये पवई येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एक 90 फुटी रुंदीचा रस्ता विकसित केला जाणार आहे. महापालिकेच्या रस्ते आणि वाहतूक विभागाच्या माध्यमातून हा रस्ता तयार केला जाणार आहे. हा रस्ता चांदीवली येथे विकसित होणार असून या रस्त्यामुळे चांदिवली येथून पवईला जाणाऱ्या खैरानी मार्गापर्यंतची वाहतूककोंडी कमी होण्यास मदत मिळणार असल्याचा दावा पालिकेकडून केला जात आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, चांदिवली येथील विकास आराखड्यातील प्रस्तावित 90 फूटी रस्ता म्हणजे 27 मीटर रुंदीचा रस्ता हा चांदिवली फार्म मार्ग आणि जोगेश्वरी-विक्रोळी मार्ग यांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता म्हणून विकसित केला जाणार आहे. दरम्यान, यासाठी नुकतीच निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

खरंतर या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी इच्छा नागरिकांची होती. यासाठी नागरिकांकडून महापालिकेकडे मागणी केली जात hoti महापालिकेने नागरिकांची मागणी गांभीर्याने घेत या रस्त्याच्या कामासाठीच्या जागेची मोजणी करून आवश्यक त्या तांत्रिक बाबी पूर्ण करून घेतल्या आहेत आणि आता या कामासाठी निविदा काढण्यात आली आहे.

हा रस्ता 27 मीटर रुंद अर्थातच 90 फूट रुंद आणि 900 मीटर लांब राहणार आहे. याचे काम मात्र दोन टप्प्यांत केले जाणार आहे. यात पहिल्या टप्प्यात नाहार येथील जागेवरील आणि दुसऱ्या टप्प्यात शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची मालकी असलेल्या जागेवरील रस्त्याचे काम होणार अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांच्या माध्यमातून समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ज्या भागात हा 90 फुटी रस्ता होणार आहे त्या ठिकाणी जवळपास 80 ते 90 बांधकामे बाधित होणार आहेत. यामुळे संबंधितांना नोटीसा बजावल्या जात आहेत. आतापर्यंत पालिकेकडून 815 नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

याशिवाय, केंद्र सरकारच्या शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची जागा या रस्त्यासाठी लागणार आहे. यामुळे ही चांदिवलीतील जागा हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. एकंदरीत जागा हस्तांतरित झाल्यानंतर आणि या जागेवरील बाधित बांधकामे हटविल्यानंतर प्रस्तावित रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार अशी माहिती समोर आली आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा