मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ दोन शहरादरम्यान तयार होणार ॲलिव्हेटेड लिंक रोड, 45 मिनिटाचा प्रवास मात्र 10 मिनिटात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai News : मुंबई शहरात आणि मुंबई महानगर प्रदेशात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण केली जात आहेत. यात काही रस्ते विकासाची कामे अंतिम टप्प्यात आहेत, काही रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत तर काही रस्ते विकासाची कामे आता सुरू होणार आहेत.

मुंबई शहरात आणि उपनगरात फ्लायओवर, भुयारी मार्ग, सागरी मार्ग विकसित केले जात आहेत. अशातच आता दहिसर ते मीरा-भाईंदर दरम्यान एलिव्हेटेड लिंक रोड तयार केला जाणार आहे. मुंबई महापालिका हा मार्ग विकसित करणार असून यासाठी तीन हजार 186 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

नुकतेच या मार्गासाठी तीन कंपन्यांनी टेंडर भरले आहे. आता यात तीन कंपन्यांपैकी जी कंपनी कमी बोली लावेल त्याला या मार्गाचे काम दिले जाणार आहे. दरम्यान आज आपण हा मार्ग कसा राहणार आहे ? याबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत.

कसा असेल मार्ग 

हाती आलेल्या माहितीनुसार, दहिसर ते मीरा-भाईंदर दरम्यानची वाहतूक समस्या सोडवण्यासाठी दहिसर पश्चिमेकडील भाग खाडी रोडवरून भाईंदर पश्चिमेला असलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत उड्डाणपुलाने जोडला जाणार आहे. दहिसर ते मीरा भाईंदर दरम्यान ॲलिव्हेटेड लिंक रोड तयार केला जाणार आहे. या मार्गाची लांबी ५.३ किमी राहणार आहे.

हा प्रस्तावित करण्यात आलेला मार्ग बीएमसी विकसित करणार आहे. या एकूण 5.3 किलोमीटर लांबीच्या रस्त्यापैकी १.५ किमी लांबीचा रस्ता हा बीएमसीच्या कार्यक्षेत्रात आणि ३.५ किमी लांबीचा रस्ता मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच या रस्त्याची रुंदी ही 45 मीटर प्रस्तावित करण्यात आली आहे.

या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ४-४ लेन असतील. म्हणजे हा एक आठ पदरी मार्ग राहणार आहे. हा रोड कंदरपारा मेट्रो स्टेशन लिंक रोड दहिसर पश्चिम येथून ते उत्तन रोडजवळील सुभाषचंद्र बोस मैदान भाईंदर पश्चिमेपर्यंत जाणार आहे. या रस्त्यामुळे 45 मिनिटांचा प्रवास मात्र दहा मिनिटात पूर्ण करता येणार आहे. या रस्त्याचे काम 2026 पर्यंत पूर्ण होईल असा दावा केला जात आहे. 

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा