गुड न्यूज ! मुंबईत ‘या’ ठिकाणी तयार होणार नवीन जेट्टी, सागरी प्रवास होणार जलद

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai News : मुंबई शहरात आणि उपनगरात प्रवासासाठी बस, रेल्वे आणि सागरी बोट ही तिन्ही महत्वाची साधने आहेत. लोकलला मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखले जाते. पण मुंबईत अशीही काही ठिकाणे आहेत जिथे लाईफ लाईन पोहोचलेली नाही.

काही असे मार्ग आहेत जिथे प्रवासासाठी फक्त आणि फक्त सागरीबोट हा एकमेव पर्याय पाहायला मिळतो. बोरिवली ते गोराई हा असाच एक मार्ग आहे.

दरम्यान बोरिवली ते गोराई हा बोटीचा प्रवास फारच आव्हानात्मक बनला आहे. हा सागरी प्रवास करताना प्रवाशांना अक्षरशः जीवमुठीत घेऊन जावे लागते. बोरिवली ते गोराई दरम्यान मानोरीची खाडी लागते. मात्र या खाडीवर कोणताही पूल नाही.

अशा स्थितीत बोरीवली ते गोराई आणि गोराई ते बोरिवली हा प्रवास करण्यासाठी बोट हे एकमेव साधन आहे. त्यामुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सागरी मार्गाने प्रवास करावा लागतो. मात्र, हा प्रवास करणे म्हणजेच जिकिरीचे आहे.

कारण की बोरिवली येथील जेट्टी पूर्णपणे नादुरुस्त झाली आहे. बोरिवली येथील ही जेट्टी खूपच जुनी आहे. यामुळे या जेट्टीवर चालणे मोठ आव्हानात्मक आहे.

विशेष म्हणजे जेट्टीवरील दिवे हे जुने झाले आहेत यामुळे येथून चालताना विशेषतः रात्रीच्या वेळी चालताना स्थानिकांना अधिक काळजी घ्यावी लागते.

ही जेट्टी कमकुवत झाली आहे. यामुळे जेट्टीवरून रात्रीच्या अंधारात बोट गाठणे जिकीरीचे ठरत आहे. म्हणून येथील स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून या जेट्टीच्या दुरूस्तीची मागणी गेल्या काही महिन्यांपासून विशेष जोर धरू लागली आहे.

अशातच मात्र बोरिवली ते गोराई दरम्यान बोटीने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एक अतिशय आनंदाची आणि नववर्षाच्या आधीच गोड बातमी समोर आली आहे.

ती म्हणजे बोरिवली बाजूने आता नवीन जेट्टी बांधली जाणार आहे. तसेच येथे तब्बल १२८० वॉट्सची दिव्यांची रोषणाई केली जाणार आहे. यासाठी साडेनऊ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. नवीन जेट्टीची लांबी 30 मीटर एवढी राहणार आहे.

सध्याच्या जेट्टीच्या उत्तरेकडे ही जेट्टी तयार होणार आहे. जेट्टीच्या दोन्ही बाजूला जवळपास साडे पाच मीटरचा उतार राहणार आहे. एकूण ५८०.०४ चौरस मीटरची जेट्टी असेल. या सर्व कामासाठी ९ कोटी ५९ लाख ६८ हजार ७७८ रुपये एवढा खर्च अपेक्षित राहणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा