Mumbai News : राजधानी मुंबईमधील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची अपडेट समोर येत आहे. खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये राजधानी मुंबईशहरासह नवी मुंबई शहरात आणि उपनगरात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे शहरात आणि उपनगरात वाहतूक कोंडीची समस्या भेडसावू लागली आहे.
वाहतूक कोंडीमुळे मुंबईकरांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे शहरातील ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वेगवेगळे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यात मुंबई शहरातील लोकलची कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी देखील वेगवेगळे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.
खरेतर मुंबई आणि उपनगरात प्रवासासाठी लोकल हे एक महत्त्वाचे साधन आहे. दररोज लाखो मुंबईकर लोकलने प्रवास करतात. लोकलने ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही खूपच उल्लेखनीय आहे.
मात्र मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलमध्येही आता मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. वाढत्या गर्दीमुळे प्रवाशांचा प्रवास खूपच आव्हानात्मक बनला आहे.
त्यामुळे आता लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी आणि मुंबई शहरासह उपनगरात वाढत असलेली लोकसंख्या विचारात घेऊन लोकलचा विस्तार केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरात पाच नवीन रेल्वे स्थानक तयार होणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार पनवेल ते कर्जत या दरम्यान नवीन रेल्वे कॉरिडॉर तयार होणार असून यामुळे लोकल सेवेचा विस्तार होणार आहे. परिणामी, या परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार असे बोलले जात आहे.
दरम्यान याच रेल्वे कॉरिडॉर अंतर्गत पाच नवीन रेल्वे स्थानक विकसित होणार आहेत. सध्या या रेल्वे मार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून या प्रकल्पांतर्गत एकूण तीन बोगदे तयार होणार आहेत.
जवळपास तीन किलोमीटर लांबीचे हे तीन बोगदे राहतील. यापैकी एका बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले असून उर्वरित दोन बोगद्याचे खोदकाम सुरू आहे.
हा प्रकल्प मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट अर्थातच एमयुटीपी 3 अंतर्गत विकसित होत आहे. या प्रकल्पा अंतर्गत 29.6 किलोमीटर लांबीचा नवीन रेल्वे कॉरिडॉर विकसित होणार आहे. दरम्यान हा प्रकल्प डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होणार अशी आशा व्यक्त होत आहे.
या रेल्वेमार्गात पनवेल, चिकले, महापे, चौक आणि कर्जत अशी पाच नवीन स्थानके विकसित केली जाणार आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांचा लोकल प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित होणार आहे.