Mumbai New Sea Link : मुंबईकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. खरंतर, गेल्या काही वर्षांमध्ये देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई आणि मुंबई उपनगरांमध्ये विविध प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. यामधील बहुतांशी प्रकल्प रस्ते विकासाशी संबंधित आहेत. यामुळे मुंबईमधील वाहतूक व्यवस्था ही आधीच्या तुलनेत अधिक मजबूत झाली आहे.
रस्ते वाहतूक सुधारण्यासाठी शासनाने प्रशासनाच्या माध्यमातून चांगले प्रयत्न झाले आहेत. मुंबईमध्ये भारतातील पहिला वहिला समुद्रावरील सर्वाधिक लांबीचा पूल विकसित झाला आहे. याला भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले आहे. या अटल सेतूमुळे मुंबईच्या वैभवात भर पडले आहे.
दरम्यान मुंबईच्या वैभवात आणखी भर घातली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये आणखी एक महत्त्वाचा रस्ते विकासाचा प्रकल्प विकसित होणार आहे. राजधानी मुंबईला लवकरच सी-लिंक प्रकल्पाची भेट मिळणार आहे.
मुंबईमध्ये तयार होणारा हा तिसरा सी-लिंक राहणार आहे. कुलाबा ते नरिमन पॉईंट दरम्यान सागरी सेतू विकसित होणार असून यामुळे कुलाबा ते नरिमन पॉईंट हा प्रवास खूपच जलद होईल अशी आशा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तथा विधानसभा अध्यक्षांच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला आहे.
कोळी बांधवांसाठी नवीन मार्ग तयार होणार आहे. म्हणजे कोळी समाजातील लोकांना केंद्रस्थानी ठेवले गेले आहे. खरे तर आधी नरिमन पॉईंट ते कफ परेड दरम्यान समुद्रातून पूल तयार करण्याची योजना होती. मात्र आता हा प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे.
म्हणजे समुद्रातून जाणारा पूल रद्द करण्यात आला असून आता त्या ऐवजी कुलाबा ते नरिमन पॉईंट दरम्यान समुद्रकिनाऱ्यावरून नवीन सागरी सेतू मार्ग तयार केला जाणार आहे. दरम्यान आता आपण हा सागरी सेतू मार्ग नेमका कसा राहणार याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कसा राहणार हा नवीन सागरी सेतू मार्ग?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, नरीमन पॉईंट येथील एनसीपीए किनाऱ्याला लागून बधवार पार्क मार्गे हा सागरी सेतू विकसित होणार आहे. हा सागरी सेतू कुलाबा फायर स्टेशन पर्यंत राहणार आहे. हा सागरी सेतू चार पदरी राहणार आहे. यातील दोन लेन नरिमन पॉईंट कडे आणि दोन लेन कुलाबाकडे जाणाऱ्या असतील.
हा मुंबईमधील तिसरा सागरी सेतू राहणार आहे. या प्रकल्पामुळे कुलाबा मधील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी कमी होईल असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे. हा मुंबईतील वैभवात भर घालणारा एक महत्त्वाचा प्रकल्प राहणार आहे.