Mumbai New Railway Station : मुंबईकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी मुंबईमधील लोकल प्रवाशांसाठी खूपच खास राहणार आहे. खरंतर मुंबई लोकलला मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखले जाते.
शहरातील बहुतांशी नागरिक लोकलने प्रवास करतात यामुळे लोकलला मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाते. लोकलचा विस्तारही खूपच मोठ्या प्रमाणात झाला आहे. शहरात आणि उपनगरात लोकलचे जाळे पसरलेले आहे. मात्र असे असले तरी काही भागातील प्रवाशांना लोकलचा प्रवास करण्यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागते.
यामध्ये अंबरनाथ ते बदलापूर दरम्यान वास्तव्यास असलेल्या नागरिकांचा देखील समावेश होतो. कारण की, अंबरनाथ ते बदलापूर स्थानकादरम्यान सात किलोमीटरचे अंतर आहे. अशा परिस्थितीत या दोन्ही स्थानकादरम्यान वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या माध्यमातून नवीन स्थानक तयार करण्याची मागणी केली जात होती.
अंबरनाथ ते बदलापूर दरम्यान नवीन चिखलोली स्थानक तयार झाले पाहिजे अशी मागणी येथील स्थानिक रहिवाशांच्या माध्यमातून केली जात होती. दरम्यान चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या चिखलोली स्थानकाची मागणी आता पूर्ण होणार आहे. लवकरच चिखलोली स्थानक तयार केले जाणार आहे. यामुळे या भागातील रहिवाशांचा लोकलचा प्रवास सुखकर होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेने या स्थानकासंदर्भात एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. अंबरनाथ आणि बदलापूरच्या मध्यात चिखलोली स्थानक आणि रेल्वेच्या प्रस्तावित तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेसाठी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनने निविदा काढल्या असल्याची माहिती एका प्रतिष्ठित वृत्तसंस्थेच्या माध्यमातून समोर आली आहे.
यामुळे आता गेल्या अनेक वर्षांपासूनची चिखलोली रेल्वे स्थानकाची मागणी लवकरच पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे. आता कल्याण ते बदलापूरपर्यंत रेल्वेची तिसरी आणि चौथी मार्गिका आणि नवीन चिखलोली स्थानकासाठी निविदा काढण्यात आली असल्याने येत्या काही वर्षांत ही दोन्ही महत्त्वाची कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.
वास्तविक, गेल्या कित्येक वर्षांपासून या स्थानकासाठी अनेकांच्या माध्यमातून मागणी केली जात होती. आता अखेरकार ही मागणी पूर्ण होणार असल्याने नागरिकांमध्ये मोठे समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
रेल्वेने निविदा काढल्याने आता या प्रकल्पाला गती मिळणार आहे यात शँकाच नाही. या स्थानकाचा अंबरनाथ, बदलापूर येथे राहणाऱ्या तसेच अंबरनाथ ते बदलापूर शहराच्या मध्यभागी राहणाऱ्या नागरिकांना देखील मोठा फायदा होणार आहे.