Mumbai New Railway Station : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईमधील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर येत आहे. ते म्हणजे मुंबईला एका नवीन रेल्वे स्थानकाची भेट मिळणार आहे.
खरंतर शहरात आणि उपनगरात गेल्या काही वर्षांपासून लोकलचे जाळे विस्तारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. शहरात आणि उपनगरातील वाहतूक व्यवस्था लोकलमुळे सक्षम झाली आहे यात शंकाच नाही. मुंबईत प्रवासासाठी लोकल एक महत्त्वाच साधन बनले आहे.
लोकलने दररोज हजारोंच्या संख्येने मुंबईकर प्रवास करत असतात. मात्र, वाढती लोकसंख्या पाहता लोकलने प्रवास करणे अलीकडे आव्हानात्मक बनले आहे. यामुळे मुंबई लोकलचा प्रवास गतिमान व्हावा यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत.
याच उपाययोजनेचा एक भाग म्हणून मुंबईमध्ये एक नवीन रेल्वे स्थानक तयार केले जाणार आहे. खरंतर अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. या भागात मोठ्या प्रमाणात नागरिक स्थायिक झाले आहेत.
मात्र असे असले तरी अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यानच्या सात किलोमीटर अंतरामध्ये कोणतेही रेल्वे स्थानक नाहीये. परिणामी या भागातील प्रवाशांना प्रवास करण्यासाठी अंबरनाथ किंवा मग बदलापूरला जावे लागते. अंबरनाथ किंवा मग बदलापूरला जाऊन लोकल पकडावी लागते. यामुळे साहजिकच अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा ताण वाढत आहे.
तसेच या दोन्ही स्थानाकदरम्यान स्थायिक झालेल्या प्रवाशांना देखील अतिरिक्त ताण सहन करावा लागत आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान एक नवीन रेल्वे स्थानक तयार झाले पाहिजे अशी मागणी होती.दरम्यान या भागातील नागरिकांची ही मागणी आता पूर्ण होणार आहे.
कारण की अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान नवीन रेल्वे स्थानक तयार केले जाणार आहे. चिखलोली हे नवीन रेल्वे स्थानक आता तयार होणार आहे. यासाठीची निविदा देखील जाहीर करण्यात आली आहे. यामुळे हे रेल्वे स्थानक येत्या काही वर्षात बांधून तयार होणार आहे. यामुळे या भागातील रेल्वे प्रवाशांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.