Mumbai New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईसह मुंबई उपनगरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात आहेत.
विशेष म्हणजे मुंबई शहरासोबत वेगवेगळ्या शहरांना जोडण्यासाठी नवनवीन महामार्ग देखील तयार होत आहे. देशाच्या आर्थिक राजधानीला सहजतेने जाता यावी यासाठी विविध महामार्ग विकसित होत आहेत.
यामध्ये JNPT-वडोदरा महामार्गाचा देखील समावेश होतो. जवाहरलाल नेहरू पोर्ट हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे कंटेनर पोर्ट अर्थातच बंदर आहे.
दरम्यान याच JNPT येथून वडोदरा पर्यंत महामार्ग तयार केला जात आहे. या महामार्ग अंतर्गत माथेरानच्या पर्वतामध्ये एक बोगदा देखील तयार होत आहे.
या कोपऱ्यामुळे पनवेल ते बदलापूर हा प्रवास फक्त आणि फक्त पंधरा मिनिटात पूर्ण होणार आहे. हा साडेचार किलोमीटर लांबीचा बोगदा राहणार असून यामध्ये दोन मार्ग करणार आहेत.
सध्या बोगद्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून आत्तापर्यंत पंचवीस टक्के एवढे काम पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे उर्वरित काम देखील लवकरात लवकर पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त होत आहे.
जुलै 2025 पर्यंत या बोगद्याचे संपूर्ण काम पूर्ण होईल असा दावा प्राधिकरण्याच्या माध्यमातून केला जात आहे. सध्या बदलापूर येथून कटाई रोड मार्गे तळोजा बायपास द्वारे खोणी तलोळा मार्गे पनवेलला जाता येते.
मात्र हा प्रवास तब्बल 38 किलोमीटरचा होता. 38 किलोमीटरच्या प्रवासासाठी वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना कधी-कधी दीड तासांचा वेळ खर्च करावा लागतो.
आता मात्र हा बोगदा पूर्ण झाल्यानंतर बदलापूर ते पनवेल प्रवासासाठी कुठेच वळसा घ्यावा लागणार नाही. या बोगद्यामुळे बदलापूर ते पनवेल हा प्रवास सुलभ होणार आहे अवघ्या साडेचार किलोमीटरच्या या बोगद्यामुळे प्रवाशांचा सव्वा तासांचा कालावधी वाचणार आहे.
दरम्यान हा संपूर्ण जेएनपीटी-वडोदरा महामार्ग जुलै 2025 पर्यंत पूर्ण होणार असा दावा करण्यात आला आहे.