मुंबईकरांसाठी गुड न्यूज ! शहरात तयार होणार नवीन कोस्टल रोड, कसा असेल रूट ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai New Coastal Road : मुंबई, नवी मुंबईसह उपनगरांमध्ये गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. उपनगरांचा मोठ्या प्रमाणात विस्तार होत आहे. यामुळे मुंबईसह उपनगरांमध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे.

वाढत्या लोकसंख्येसाठी मात्र सध्याची वाहतूक व्यवस्था अपुरी पडत आहे. हेच कारण आहे की, शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न होत आहेत.

याचाच एक भाग म्हणून शहरात मेट्रो सुरू करण्यात आली आहे. लोकलचा देखील विस्तार केला जात आहे. वेगवेगळ्या रस्ते विकासाची देखील कामे सुरू आहेत.

मुंबईमध्ये कोस्टल रोडचे देखील काम सुरू आहे. दरम्यान आता नवी मुंबईमध्ये देखील एक सागरी रस्ता तयार केला जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सिडकोच्या माध्यमातून खारघर ते उलवेपर्यंत नवीन सागरी रस्ता तयार केला जाणार आहे. विशेष बाब म्हणजे या सागरी किनारा रस्त्यासाठी अर्थातच कोस्टल रोड साठी निधीची देखील तरतूद करण्यात आली आहे.

सिडको ने 2023-24 अर्थसंकल्पात या रस्त्यासाठी 205 कोटी 49 लाख रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे नवी मुंबई शहरातील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी कमी होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.

या रस्त्यामुळे खारघर नोड येथून उलवे, जेएनपीए बंदरासह नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाणे सोयीचे होणार आहेत.

सध्या खारघर येथून उलवे जेएनपीए आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाण्यासाठी बेलापूर नोडला वळसा घालून जावे लागत आहे. यामुळे हा सागरी किनारा रस्ता नवी मुंबई मधील नागरिकांसाठी खूपच महत्त्वाचा ठरणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार हा सागरी किनारा रस्ता एकूण 10.10 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. हा एक 6 लेनचा रस्ता राहील. यामुळे नवी मुंबईची आणि दक्षिण मुंबईची कनेक्टिव्हिटी आणखी सुधारणार आहे.

विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली सीआरझेडची परवानगी देखील सिडकोला मिळालेली आहे. यामुळे या प्रकल्पाचे काम जलद गतीने होणार अशी आशा आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा