Mumbai Nagpur Railway News : मुंबई ते नागपूर आणि नागपूर ते मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राज्य राजधानी आणि नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखली जाते. या दोन्ही कॅपिटल शहरा दरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करतात.
या दोन्ही शहरांदरम्यान प्रामुख्याने रेल्वे मार्गाने प्रवास केला जातो. आता या मार्गावरील रेल्वे प्रवाशांचा प्रवास मात्र गतिमान होणार आहे. या मार्गावरील एक्सप्रेस गाड्यांचा प्रवास आता आधीच्या तुलनेत जलद होणार आहे. यामुळे प्रवाशांचा तब्बल अर्ध्या तासाचा वेळ वाचणार असल्याचा दावा केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार इगतपुरी-भुसावळ-बडनेरा या सेक्शन मध्ये गाड्यांचा वेग 130 किलोमीटर प्रतितास एवढा होणार आहे. यामुळे मुंबई ते नागपूर दरम्यान धावणाऱ्या गाड्यांना फायदा मिळणार आहे. अलीकडेच याची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे, ज्यामध्ये ताशी 130 किमी वेगाने गाड्या चालवल्या गेल्या आहेत.
भविष्यात आता इगतपुरी-भुसावळ-बडनेरा या 526 किलोमीटरच्या मार्गावर गाड्या तब्बल 130 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावणार आहे. सध्या स्थितीला या मार्गावर धावणाऱ्या विदर्भ, सेवाग्राम आणि गीतांजली एक्सप्रेस तासी 90 किलोमीटर वेगाने धावत आहेत. मात्र दुरांतो एक्सप्रेस ताशी 110 किलोमीटर वेगाने धावण्यास सक्षम आहे.
परंतु आता या सर्व ट्रेन 130 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावतील अशी माहिती समोर आली आहे. यामुळे प्रवाशांच्या प्रवासात तब्बल अर्ध्या तासाची बचत होणार आहे. या गाड्यांना मुंबई ते नागपूर हा प्रवास करण्यासाठी 11 ते 12 तासांचा कालावधी लागतो.
मात्र आता यामध्ये तब्बल अर्ध्या तासाची बचत होणार आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, 26 ते 30 ऑगस्ट दरम्यान इगतपुरी-भुसावळ-बडनेरा सेक्शनच्या 526.76 किमी वर अप आणि डाऊन दिशेने या मार्गांवरील 6 ट्रेन ताशी 130 किमी वेगाने चालवून याची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.
या गाड्यांची चाचणी घेण्यात आली
१२२८९ सीएसएमटी-नागपूर दुरांतो एक्सप्रेस
१२२९० नागपूर-सीएसएमटी दुरांतो एक्सप्रेस
१२१०५ सीएसएमटी-गोंदिया विदर्भ एक्सप्रेस
१२१०६ गोंदिया-सीएसएमटी विदर्भ एक्सप्रेस
१२८५९ सीएसएमटी-हावडा गीतांजली एक्सप्रेस
१२८६० हावडा-सीएसएमटी गीतांजली एक्सप्रेस
आता भविष्यात दुरांतो, विदर्भ आणि गीतांजलि एक्सप्रेस या गाड्या या मार्गावर 130 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावणार आहेत. यामुळे, अप मार्गावरील गाड्यां तीस मिनिटांनी लवकर पोहोचणार आहेत आणि डाऊन मार्गावरील गाड्या 28 मिनिटांनी लवकर पोहोचणार आहेत.