कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा केव्हा सुरू होणार ? मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने थेट तारीखच सांगितली

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Metro : देशाच्या आर्थिक राजधानीत गेल्या काही वर्षांमध्ये मेट्रोचे जाळे विकसित करण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. शासनाच्या सूचनेनुसार मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून शहरातील विविध मार्गांवर मेट्रो सुरु करत आहे. विशेष म्हणजे मेट्रोला मुंबईकरांनी चांगले प्रेम दाखवले आहे.

मेट्रोमुळे मुंबईकरांचा प्रवास वेगवान आणि सुरक्षित झाला आहे. दरम्यान मुंबईकरांच्या जिव्हाळ्याच्या अशा मेट्रोबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो मार्ग अर्थातच मेट्रो मार्ग तीन लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

या मार्गाचा पहिला टप्पा अर्थातच आरे ते बीकेसी दरम्यान लवकरच मेट्रो सुरू होणार आहे. आरे ते बीकेसी दरम्यान प्रत्यक्षात मेट्रो केव्हा सुरू होणार याबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे. पुढील आठवड्यात म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबई मेट्रो 3 चा नववा रेक आरेला पोहोचणार आहे.

यानंतर मग त्याची चाचणी घेतली जाणार आहे. सध्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन पहिल्या टप्प्यातील चाचणीसाठी हा मार्ग तयार करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे. या मार्गावर मेट्रो सुरू करण्यासाठी 9 मेट्रोचे रेक आवश्यक आहेत. यापैकी आठ रेक आधीच मुंबई येथील आरे येथील कारशेड मध्ये दाखल झाले आहेत.

आता या मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी मेट्रोचा शेवटचा रेक आंध्र प्रदेशातील श्रीसिटी येथून रस्त्याने मुंबईकडे रवाना झाला आहे. एमएसआरसीच्या म्हणण्यानुसार मेट्रोचा नववा रेक मुंबईजवळ पोहोचला आहे.

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आरेच्या कारशेड मध्ये पोहोचणे अपेक्षित आहे. दरम्यान शेवटचा 9 वा रेक कारशेड मध्ये पोहोचल्यानंतर त्याची असेंबलींग आणि टेस्टिंग केली जाणार आहे. त्यासाठी जवळपास 15 ते 20 दिवसांचा काळ लागेल. म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत हे सर्व काम पूर्ण होणार आहे.

सध्या आरे ते विद्यानगरी स्थानकादरम्यान मेट्रोची ट्रायल रन सुरू आहे. मात्र आरे येथील कारशेडमध्ये नववी मेट्रो दाखल झाली की मग आरे ते बीकेसी दरम्यान ट्रायल रन सुरू होणार आहे. त्यानंतर मग मुंबईमधील या पहिल्या भूमिगत मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा अर्थातच आरे ते बीकेसी प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. डिसेंबर अखेरपर्यंत मेट्रोचा हा टप्पा प्रवाशांच्या सेवेत दाखल होऊ शकतो असे चित्र तयार होत आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा