मुंबईमधील ‘या’ भूमिगत मेट्रो मार्ग उद्घाटनाची तारीख पुन्हा हुकली; आता केव्हा सुरु होणार Underground Metro ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Metro News : मुंबई लोकलमध्ये वाढणारी गर्दी पाहता आता शहरात मेट्रोचे जाळे विकसित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यानुसार काही मेट्रो मार्गांचे कामे पूर्ण झाले आहेत तर काही मेट्रो मार्गांचे काम सध्या अंडर कन्स्ट्रक्शन आहेत.

यामध्ये मेट्रो मार्ग तीन प्रकल्पाचा देखील समावेश होतो. या प्रकल्पांतर्गत देशातील पहिला भूमिगत मेट्रो मार्ग विकसित होत आहे. म्हणजेच देशातील पहिली भूमिगत मेट्रो राजधानी मुंबईमध्ये सुरू होणार आहे.

खरे तर या प्रकल्पाचा पहिला भाग हा डिसेंबर अखेरपर्यंत सुरू होणार अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र मुख्यमंत्री महोदय यांची घोषणा हवेतच विरणार आहे. कारण की या मेट्रो मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन डिसेंबर अखेर होणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.

वास्तविक, हा भूमिगत मार्ग पश्चिम उपनगरांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. पश्चिम उपनगरांमधील उत्तरेकडील आरे ते दक्षिणेकडील कफ परेड यादरम्यान हा 33 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग विकसित होत आहे.

या प्रकल्पांतर्गत एकूण 27 रेल्वे स्थानके विकसित होणार असून यापैकी 26 रेल्वे स्थानके भूमिगत राहणार आहेत तर एकच स्थानक जमिनीवर राहणार आहे. या संपूर्ण मार्गिकेचा पहिला टप्पा हा आरे ते प्राप्तीकर कार्यालय (बीकेसी) असा राहणार आहे. या पहिल्या टप्प्यात एकूण दहा स्थानके राहणार आहेत.

हा पहिला टप्पा डिसेंबर अखेरीस सुरू होणार असा दावा केला जात होता. या टप्प्यासाठी एकूण नऊ गाड्या वापरल्या जाणार असून या सर्व गाड्या आरे येथील कारशेड मध्ये पोहचल्या आहेत. मात्र, तरीही याची अंतिम चाचणी बाकी असल्याने मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा डिसेंबर 2023 अखेरपर्यंत सुरू होणार नसल्याचे बोलले जात आहे.

खरे तर डिसेंबरमध्ये हा पहिला टप्पा सुरू करण्यासाठी नोव्हेंबरमध्ये मेट्रो गाडीची कमाल वेगाने अंतिम चाचणी होणे गरजेचे होते. पण ही चाचणी अजून पूर्ण झालेली नाही. यामुळे आता हा टप्पा डिसेंबर अखेरीस सुरू होणार नाही हे जवळपास स्पष्ट झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या पहिल्या टप्प्यातील भुयारीकरणाचे १०० टक्के काम पूर्ण झाले आहे. यातील स्थानकांची उभारणी देखील ९८ टक्के एवढी पूर्ण झाली आहे. तसेच चार स्थानके जवळपास पूर्ण बांधून सज्ज झाली आहेत. प्रणालीशी निगडित कामे सुद्धा ९० टक्के पूर्ण झाली आहेत.

पण आरे कारशेडचे काम बरेच बाकी आहे. एकंदरीत या भूमिगत मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली कमाल वेगाची अंतिम चाचणी पूर्ण झालेली नसल्याने हा पहिला टप्पा डिसेंबर 2023 पूर्ण होणार नाही हे जवळपास नक्की झाले आहे.

यामुळे आता हा पहिला टप्पा केव्हा सुरू होणार याकडे मुंबईकरांचे विशेष लक्ष राहणार आहे. दरम्यान, येत्या नवीन वर्षात म्हणजेच 2024 मध्ये मुंबईकरांना भूमिगत मेट्रोचा लाभ मिळू शकतो असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा