मुंबईमधील दक्षिण भागातील नागरिकांना मिळणार मेट्रोची भेट ! शहरातील ‘हा’ मेट्रो मार्ग लवकरच सुरू होणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Metro News : मुंबईमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम बनवण्यासाठी शहरात रेल्वे वाहतूक बळकट करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. यामध्ये लोकलचा विस्तार केला जात आहे. मोनोरेल सुरु करण्यात आली आहे. येत्या काही वर्षांमध्ये वंदे मेट्रो देखील सुरू होणार आहे.

तसेच सध्या मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी मेट्रो सुरू करण्यात आली आहे. दरम्यान मुंबई शहरातील दक्षिण भागातील नागरिकांना आणखी एका नवीन मेट्रोमार्गाची भेट मिळणार असे वृत्त समोर आले आहे.

मीडिया रिपोर्ट नुसार नवीन वर्षात अर्थातच 2024 मध्ये दक्षिण मुंबई भागातील नागरिकांसाठी मेट्रो सुरु केली जाणार आहे. शहरातील मेट्रो मार्ग तीन लवकरच सुरू होणार आहे. हा मेट्रो मार्ग 2024 च्या अगदी सुरुवातीला सुरू केला जाईल असा दावा करण्यात आला आहे.

कुलाबा-वांद्रे-सिप्झ हा मेट्रो 3 मार्ग 33 किलोमीटर लांबीचा आहे. विशेष म्हणजे हा एक भूमिगत मार्ग आहे. या मेट्रोमार्ग अंतर्गत विकसित होत असलेली सत्तावीस पैकी 26 स्टेशन ही भूमिगत आहेत.

या मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा अर्थातच मेट्रो मार्ग तीन फेज एक नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीला सुरू होणार आहे. या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन 2024 च्या अगदी सुरुवातीलाच केले जाईल असा दावा करण्यात आला आहे.

त्यामुळे आता शहरातील दक्षिण भागातील नागरिकांना नवीन वर्षात तरी मेट्रोची भेट मिळते का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सध्या या मेट्रो मार्गाच्या फेज एक वर ट्रायल रन घेतली जात आहे.

ट्रायल रन दरम्यान पाच ते दहा किलोमीटरच्या अंतरावर मेट्रो चालवली जात आहे. यामध्ये 65 किलोमीटर प्रतितास या वेगाने मेट्रो धावत आहे. मात्र या मेट्रोचा कमाल वेग हा 100 किलोमीटर प्रतितास एवढा आहे.

ही मेट्रो आंध्र प्रदेशमध्ये तयार करण्यात आली आहे. ही संपूर्ण भारतीय बनावटीची मेट्रो आहे. सध्या शहरात मुंबई मेट्रो तीन साठी 12 गाड्या दाखल झाल्या आहेत. टप्प्याटप्प्याने या गाड्यांची संख्या आणखी वाढणार आहे.

या मार्गाच्या फेज 1 मधील अंधेरी ते एमआयडीसी या मार्गावरील सर्व स्थानकांची कामे पूर्ण झाली आहेत. यामुळे या मार्गावर आता लवकरच मेट्रो सुरु होणार आहे.

तथापि या मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन कोणत्या तारखेला होणार याबाबत कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हा पहिला फेज सुरू होणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा