मुंबई मेट्रोबाबत गुड न्यूज ! ‘या’ मेट्रो मार्गाचा विस्तार होणार, चिताकॅम्पपर्यंत मेट्रो धावणार, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Metro News : मुंबई शहरातील आणि उपनगरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. शहरात आणि उपनगरातील वेगवेगळ्या मार्गावर सध्या मेट्रोचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. अशातच मुंबई मेट्रोबाबत एक अतिशय मोठी आणि गुड न्यूज समोर आली आहे.

ती म्हणजे मुंबई मेट्रोचा विस्तार आता चिता कॅम्प पर्यंत होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेट्रो 2 ब मार्गाचा विस्तार केला जाणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की हा मार्ग डीएन नगर ते मंडाळेदरम्यान प्रस्तावित आहे. मात्र आता या मार्गाचा विस्तार चिता कॅम्प पर्यंत केला जाणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यासाठी मुंबई मेट्रो प्रशासनाने प्रस्ताव तयार केला असून सदर प्राधिकरणाच्या प्रस्तावाला आता मान्यता देण्यात आली आहे. प्राधिकरणाच्या या विस्तारिकरणाच्या प्रस्तावाला नगर विकास विभागाने मान्यता दिली असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता मेट्रो दोन ब हा मार्ग डी एन नगर ते चिता कॅम्प दरम्यान तयार केला जाणार आहे.

यामुळे चिता कॅम्प परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांना देखील आता मेट्रोने वेगवान प्रवास करता येणे शक्य होणार आहे. यामुळे प्राधिकरणाच्या संबंधित निर्णयाचे परिसरातील नागरिकांनी स्वागत केले आहे. दरम्यान या मार्गाचा विस्तार करून चिता कॅम्प येथे मेट्रोचे स्थानक विकसित केले जाणार आहे.

यासाठी 205 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. हा खर्च मुंबई मेट्रो कडून केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने मुंबई शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेट्रो 2 ब हा मार्ग प्रस्तावित केला आहे. याअंतर्गत डीएन नगर ते मंडाळेपर्यंत मेट्रो धावणार आहे.

हा मार्ग डीएननगर, अंधेरी पश्चिम – वांद्रे पश्चिम – वांद्रे कुर्ला संकुल – कुर्ला – चेंबूर – मानखुर्द – मंडाळे असा प्रस्तावित करण्यात आला आहे. पण आता मेट्रोच्या माध्यमातून हा मार्ग चिता कॅम्प पर्यंत विस्तारित केला जाणार आहे. खरंतर मेट्रो 2 ब अंतर्गत डीएन नगर ते मंडाळे हा 22.64 किलोमीटरचा मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आला होता.

पण आता मंडाळे येथील शेवटच्या स्थानकापासून 1.023 किलोमीटर लांब चिता कॅम्प पर्यंत एकेरी मार्गिका तयार केली जाणार आहे. निश्चितच या मेट्रो मार्गाचा विस्तार होणार असल्याने चिता कॅम्प परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

चिता कॅम्प हा परिसर शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या मतदार संघात येतो. आता पुढल्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. यामुळे आत्तापासूनच शेवाळे यांची दावेदारी मजबूत करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून ही रणनीती तयार केली जात असल्याचे सांगितले जात आहे.