मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! शहरातील ‘हा’ महत्त्वाचा मेट्रो मार्ग पुढील वर्षी वाहतुकीसाठी खुला, कसा असेल रूटमॅप ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Metro News : मुंबईकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर गेल्या काही वर्षांपासून मुंबई शहरात आणि उपनगरात वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे.

शहरातील नागरिकांचा प्रवास अधिक जलद आणि सोयीचा व्हावा यासाठी मुंबई मेट्रोचा विस्तार केला जात आहे. दरम्यान मुंबई शहरातील नागरिकांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा मुंबई मेट्रोबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार पुढील वर्षी शहरातील एक अतिशय महत्त्वाचा मेट्रो मार्ग सुरू होणार आहे. अंधेरी पश्चिम ते मानखुर्द मेट्रो मार्ग पुढील वर्षी सुरु होणार असल्याचे वृत्त हाती आले आहे.

अंधेरी पश्चिम ते मानखुर्द हा प्रवास गतिमान व्हावा यासाठी मेट्रो 2 चा विस्तार केला जात आहे. याअंतर्गत मेट्रो 2 ब हा मार्ग विकसित केला जात असून अंधेरी पश्चिम ते मंडाळे दरम्यान मेट्रो मार्ग तयार केला जाणार आहे.

सध्या स्थितीला या मेट्रो मार्गाचे जोमात काम सुरू आहे. विशेष म्हणजे या मार्गाचे बरेचसे काम पूर्ण देखील झाले आहे. त्यामुळे पुढील वर्षी या मार्गाचा मंडाळे ते चेंबूर हा टप्पा सुरू होणार असा आशावाद व्यक्त केला जात आहे.

या मार्गावर मेट्रो सुरु करण्यासाठी बेंगलोर येथून गाड्या मागवल्या जात आहेत. आतापर्यंत तीन गाड्या दाखल झाल्या आहेत. या गाड्या मंडाळे येथील कारशेडमध्ये उभ्या केल्या आहेत.

दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो 2 अ चा विस्तार म्हणून अंधेरी पश्चिम ते मंडाळे हा मेट्रो 2 ब मार्ग तयार केला जात आहे. या अंतर्गत 23.64 किलोमीटर लांबीचा मार्ग तयार केला जात आहे.

यासाठी आतापर्यंत तीन मेट्रो गाड्या बंगलोर येथून कारशेडमध्ये पोहचल्या आहेत. उर्वरित गाड्या टप्प्याटप्प्याने आता कारशेड मध्ये येणार आहेत.

एकंदरीत मुंबईकरांना आता पुढील वर्षी या नवीन मेट्रो मार्गाची भेट मिळणार असून या परिसरातील प्रवाशांचा प्रवास या निमित्ताने गतिमान होणार आहे. त्यामुळे आता हा मेट्रोमार्ग केव्हा सुरू होतो याकडेच नागरिकांचे लक्ष लागून आहे.

हा मेट्रो मार्ग पुढील वर्षी म्हणजे 2024 मध्ये सुरू होईल असा दावा केला जात आहे. मात्र खरंच नियोजित वेळेत हा मेट्रो मार्ग प्रवाशांसाठी सुरू होणार का हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा