खुशखबर ! आता मुंबईतून कल्याण-तळोजाला पोहोचणे होणार सोपे, लवकरच सुरू होणार ‘या’ मेट्रो मार्गाचे काम

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Metro News : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थातच एमएमआरडीएच्या माध्यमातून राजधानी मुंबई आणि उपनगरात मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. खरंतर, जेव्हा केव्हा मुंबईचा विषय निघतो तेव्हा लोकलचे चित्र सर्वप्रथम डोळ्यापुढे उभे राहते.

लोकलला मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखले जाते. पण लोकलचा प्रवास हा खूपच गर्दीचा आहे. लोकलमध्ये वाढणारी गर्दी आणि होणारे अपघात यामुळे मुंबईकर खूपच त्रस्त आहेत.

यामुळे यावर उपाययोजना म्हणून एसी लोकल सारखा पर्याय अवलंबला जात आहे. शिवाय मेट्रो देखील सुरू केल्या जात आहेत.

अशातच आता कल्याण-तळोजा मेट्रो १२ मार्गिकेचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. यामुळे आता मुंबईकरांना ठाणे तसेच नवी मुंबईला पोहोचण सुलभ होईल अशी आशा आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या मेट्रोमार्गासाठी आवश्यक असलेल्या कारशेडसाठी एक हजार 877 कोटी रुपयांचे निविदा जाहीर करण्यात आले आहे.

म्हणजेच आता निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर याचे बांधकाम सुद्धा सुरू होणार आहे. प्रत्यक्ष बांधकाम सुरू झाल्यानंतर 2025 पर्यंत हा मेट्रोमार्ग सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे.

या प्रकल्पाअंतर्गत वीस किलोमीटर लांबीचा मार्ग तयार केला जाणार आहे. तसेच या संपूर्ण प्रकल्पासाठी 5600 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

दरम्यान, या मेट्रो मार्गामुळे आणि शहरातील अन्य काही मेट्रो मार्गामुळे कल्याण, डोंबिवली, भिवंडी, ठाणे, नवी मुंबई, मुंबईशी परस्परांना जोडली जाणार आहेत.

या मेट्रो मार्गावर कल्याण, एपीएमसी कल्याण, गणेश नगर, पिसवली गाव, गोळवली, डोंबिवली एमआयडीसी, सागाव, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटने, कोलेगाव, निळजे गाव, वडवली, बाळे, वाकलन, तुर्भे, पिसर्वे आगार, पिसर्वे, अमनदूत हे महत्त्वाचे स्थानके राहणार आहेत.

यामुळे आता या मेट्रो मार्गाचे काम आगामी काही महिन्यांमध्ये सुरू होईल आणि 2025 पर्यंत हा प्रकल्प मुंबईकरांसाठी सुरू होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा