कल्याण, डोंबिवलीकरांसाठी गुड न्यूज ! तयार होणार नवीन मेट्रो मार्ग, कसा असणार रूट, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Metro News : मुंबई शहरात आणि उपनगरात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे शहरात आणि उपनगरात वाहतूक कोंडीची समस्या जटील बनत चालली आहे. यामुळे आता शहरात आणि उपनगरात मेट्रोचे जाळे तयार केले जात आहे.

आतापर्यंत काही मार्गांवर मेट्रोची सेवा सुरू झाली आहे तर काही मार्गांवर मेट्रोचे बांधकाम सुरू आहे. अशातच आता कल्याण आणि डोंबिवलीकरांसाठी आणखी एक मेट्रो मार्ग तयार केला जाणार आहे.

हा मेट्रो मार्ग कल्याण आणि डोंबिवली शहराला मुंबई आणि नवी मुंबई थेट जोडला जाईल आणि यामुळे कल्याण आणि डोंबिवली शहरातून मुंबई आणि नवी मुंबईमध्ये जलद गतीने प्रवास करता येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मेट्रो मार्ग क्रमांक बारा म्हणजेच कल्याण तळोजा मेट्रो मार्गसाठी एम एम आर डी ए अर्थातच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून निविदा काढण्यात आली आहे. या मेट्रो मार्गाच्या बांधकामासाठी एक हजार 877 कोटी रुपयांची निविदा जाहीर करण्यात आली आहे.

हा मेट्रो मार्ग प्रकल्प ठाणे शहराच्या पलीकडे वसलेल्या कल्याण आणि डोंबिवली शहरांना ठाणे, भिवंडी, नवी मुंबई आणि थेट मुंबईशी कनेक्टिव्हिटी देणार आहे. या प्रकल्पासाठी जवळपास 5865 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

दरम्यान या प्रकल्पाचे सर्वेक्षण नुकत्याच काही महिन्यांपूर्वी पूर्ण झाले असून आता या प्रकल्पासाठी निविदा जाहीर करण्यात आली आहे. यामुळे या मेट्रो मार्गाचे प्रत्यक्षात बांधकाम लवकरच सुरू होणार असा आशावाद व्यक्त होत आहे.

या प्रकल्पांतर्गत 17 नवीन स्थानक विकसित होणार आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की शहरात सुरू असलेला मेट्रोमार्ग 4 वडाळा ते ठाणे शहराला जोडत आहे.तसेच ठाणे ते कल्याण दरम्यान मेट्रो मार्ग पाच तयार होत आहे. दरम्यान आता कल्याण येथून तळोजापर्यंत मेट्रो मार्ग 12 विकसित होणार आहे.

विशेष म्हणजे नुकतीच सुरू झालेल्या नवी मुंबई मधील मेट्रोचा देखील नागरिकांना लाभ मिळणार आहे. यामुळे या मेट्रो मार्ग बारा प्रकल्पामुळे कल्याण आणि डोंबिवली शहरातील नागरिकांना मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईशी कनेक्ट केले जाणार आहे.

कसा असणार रूट ?

या मेट्रो मार्गावर एकूण 17 नवीन स्थानके तयार होणार आहेत. हा 20.75 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग राहील. हा संपूर्ण मेट्रो मार्ग उन्नत राहणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, या मेट्रो मार्गावर कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती, गणेश नगर, पिसवली गाव, गोलवली, डोंबिवली एमआयडीसी, सागाव, सोनार पाडा, मानपाडा, हेदूटने, कोळेगाव, निळजे गाव, वडवली, बाळे, वाकळण, तुर्भे, पिसार्वे आणि तळोजा हि महत्वाची स्थानके राहणार आहेत.

यामुळे कल्याण आणि डोंबिवली शहरातील नागरिकांसाठी प्रवासाची एक नवीन आणि जलद पर्यायी सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे शहरातील विकासाला चालना मिळणार आहे. 

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा