मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी ! अंधेरी ते Mumbai Airport चा प्रवास होणार मात्र 8 मिनिटात, महत्वाच्या मेट्रो प्रकल्पाला सुरुवात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Metro News : तुम्ही मायानगरी, स्वप्ननगरी, बॉलीवूड नगरी राजधानी मुंबईतील रहिवासी आहात ना? मग आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे. कारण की आता अंधेरी ते मुंबई एअरपोर्टचा प्रवास फक्त आठ मिनिटात पूर्ण होणार अशी बातमी समोर आली आहे.

कदाचित हे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही मात्र हे खरं आहे. अंधेरी ते मुंबई एअरपोर्टचा प्रवास आता फक्त आणि फक्त आठ मिनिटात करता येणे शक्य होणार आहे. यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून नुकतेच एक महत्त्वाचे काम हाती घेण्यात आले आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीएने अंधेरी ते मुंबई एअरपोर्टचा प्रवास गतिमान व्हावा, येथील प्रवाशांना मेट्रो मार्गाची सुविधा उपलब्ध व्हावी यामुळे अंधेरी पूर्व येथील गुंदवली ते छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टच्या टर्मिनल दोन दरम्यान मेट्रो मार्ग विकसित केला जाणार आहे.

एम एम आर डी ए मेट्रो मार्ग सात चा विस्तार करत आहे. यानुसार मेट्रो 7 अ प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत आता अंधेरी पूर्व ते मुंबई एअरपोर्ट दरम्यान बहुतांशी भुयारी आणि अंशतः उन्नत मेट्रो मार्गीका विकसित केली जाणार आहे.

कसा असणार हा मेट्रो प्रकल्प

एमएमआरडीएकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार अंधेरी पूर्व येथील गुंदवली ते छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट यादरम्यान 3.442 किलोमीटर लांबीचा मेट्रोचा मार्ग तयार केला जाणार आहे. या मेट्रो मार्गापैकी जवळपास अडीच किलोमीटरचा मेट्रो मार्ग हा अंडरग्राउंड अर्थातच भुयारी राहणार आहे. तर उर्वरित मार्ग हा उन्नत मार्ग म्हणून विकसित केला जाणार आहे.

प्रवासात होणार तब्बल 22 मिनिटांची बचत

खरंतर, सध्या अंधेरी पूर्व पासून मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट दरम्यान प्रवास करण्यासाठी तब्बल अर्धा तासाचा वेळ प्रवाशांना खर्च करावा लागत आहे. मात्र आता या प्रवाशाच्या वेळेत मोठी बचत होणार आहे.

या प्रवासात तब्बल 22 मिनिटांची बचत होणार असल्याचा दावा केला जात आहे. म्हणजेच या नव्याने हाती घेण्यात आलेल्या मेट्रोमार्गामुळे फक्त आणि फक्त आठ मिनिटात अंधेरी पूर्व ते मुंबई येथील एअरपोर्ट दरम्यान प्रवास करता येणे शक्य होणार आहे.

काम केव्हा पूर्ण होणार 

या मेट्रो सात अ मार्गाचे काम 1 सप्टेंबर पासून सुरू झाले आहे. सध्या भूमिगत म्हणजेच अंडरग्राउंड मार्गासाठी टनेल मशीनच्या माध्यमातून बोगदा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. या भुयारी मार्गाचे प्राथमिक काम येत्या एका महिन्यात पूर्ण होणार आहे.

प्राथमिक काम पूर्ण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार बोगद्याचे काम मे 2024 पर्यंत एमएमआरडीएकडून पूर्ण केले जाणार आहे.