Mumbai Metro News : महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. राजधानी मुंबई, सांस्कृतिक राजधानी पुणे आणि उपराजधानी नागपूर या तीन शहरांमध्ये मेट्रोचे जाळे तयार होत आहे. या तिन्ही शहरांमध्ये काही मार्गांवर मेट्रो सुरू देखील झाली आहे. दरम्यान राजधानी मुंबई मधील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे.
ती म्हणजे शहरातील नागरिकांना लवकरच आणखी एका मेट्रो मार्गाची भेट मिळणार आहे. मुंबई शहरातील पहिला भुयारी मेट्रो मार्ग लवकरच सर्वसामान्य प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर येत आहे.
यामुळे मुंबईकरांचा प्रवास आणखी जलद होणार अशी आशा व्यक्त होत आहे. मुंबई मेट्रोमार्ग 3 प्रकल्पाचा पहिला टप्पा अर्थातच आरे ते बीकेसी या मार्गावर लवकरच मेट्रो सुरु होणार आहे.
हा भूमिगत मेट्रो मार्ग असून हा मार्ग सुरू झाल्यानंतर मुंबईकरांना भुयारी मार्गाने प्रवास करता येणार आहे. दरम्यान यासाठीच्या चाचण्या देखील आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे या चाचण्या मे अखेरपर्यंत पूर्ण होतील असा दावा केला जात आहे. यानंतर मग मेट्रो लाइन आणि उपकरणांची आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्वतंत्र संस्थेमार्फत चाचणी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
यात ISA प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मेट्रो प्रवाशांसाठी खुली होणार आहे. या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणखी दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी लागणार असे बोलले जात आहे. यामुळे, मेट्रो तीनचा पहिला टप्पा हा जुलै महिन्यात सुरू होऊ शकतो असा अंदाज आहे.
म्हणजे मुंबईकरांना जुलै 2024 पासून अंडरग्राउंड मेट्रो ने प्रवास करता येणार आहे. आरे ते बीकेसी दरम्यान सध्या युद्ध पातळीवर ट्रायल रन सुरु आहे. यामुळे येत्या काही दिवसात हे ट्रायल रन पूर्ण होणार आहे.
ट्रायल रन पूर्ण झाल्यानंतर आणि मेट्रो वाहतूक सुरू करण्यासाठी आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर या मार्गावर मेट्रो धावू शकणार आहे. यामुळे आता पावसाळ्यात या भूमिगत मार्गाने मेट्रो वरून प्रवास करता येणार का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.