धक्कादायक ! मुंबईमधील ‘हा’ महत्त्वाचा मेट्रो मार्ग प्रकल्प रद्द होणार ? प्रवाशांचे जलद प्रवासाचे स्वप्न भंगणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Metro News : कोणत्याही शहराच्या, प्रदेशाच्या, राज्याच्या किंवा मग देशाच्या विकासात तेथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था महत्वाची भूमिका निभावते. अशा परिस्थितीत शासनाकडून संपूर्ण देशभरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी कंबर कसण्यात आली आहे. यामुळे देशाचे आर्थिक राजधानी आणि राज्याची राज्य राजधानी मुंबईमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी बळकट करण्यासाठी मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे.

मुंबई शहरात आणि उपनगरात मेट्रोचे जाळे विकसित करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. अशातच मात्र मुंबई मेट्रोच्या एका महत्त्वाच्या मार्गासंदर्भात एक मोठी अपडेट हाती आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, कल्याण ते तळोजा हा मेट्रो मार्ग 12 आता चांगलाच रखडणार आहे. कारण की, मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थातच एम एम आर डी ए च्या माध्यमातून या प्रकल्पाचा पर्यावरणावर व वनांवर किती परिणाम होत आहे याचा अभ्यास केला जाणार आहे.

साहजिकच यासाठी अधिकचा वेळ लागणार आहे. खरंतर या मेट्रो मार्गासाठी फेब्रुवारी 2023 मध्ये निविदा काढण्यात आली होती. पण ही निविदा अलीकडेच रद्द झाली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या मेट्रो मार्गाचा डीपीआर 2019 मध्ये तयार करण्यात आला होता. यानंतर या चालू वर्षी म्हणजेच फेब्रुवारी 2023 मध्ये यासाठी निविदा काढण्यात आली. पण ही निविदा अलीकडेच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत विचारणा झाली असता मार्गिकेचे आरेखन बदलून ही मार्गीका तळोजाऐवजी नवी मुंबईच्या पेंधर या स्थानकाला जोडली जाणार असल्याचा युक्तिवाद पुढे करत या मेट्रो मार्ग 12 ची निविदा रद्द करण्यात आली असल्याचे संबंधिताच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच या मार्गीकेवरील बाळे व तळोजा या दोन स्थानकादरम्यान असलेल्या सात किलोमीटरच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वने असल्याने मार्गिकेमुळे वनावर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि यामुळे पर्यावरचा ऱ्हास होण्याचा अंदाज आहे.

अशा स्थितीत ही मार्गीका या भागात तयार केल्यास याचा पर्यावरणावर काय परिणाम होईल आणि हा परिणाम होऊ नये यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत याचा एमएमआरडीएच्या माध्यमातून आता अभ्यास केला जाणार आहे. यासाठी एका सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. त्याच्या नियुक्तीसाठी नुकतीच निविदा देखील जारी करण्यात आली आहे.

आता ही निविदा जो कंत्राटदार घेईल त्याला या मार्गामध्ये येणाऱ्या पर्यावरणीय अडथळ्यांचा अभ्यास करायचा आहे आणि एक सखोल असा अहवाल तयार करायचा आहे. तसेच संबंधित कंत्राटदाराला वन खात्याची परवानगी देखील मिळवावी लागणार आहे. विशेष म्हणजे हे काम संबंधित कंत्राटदाराला एका वर्षाच्या आत पूर्ण करायचे आहे.

याचाच अर्थ आता या मार्गिकेचे काम किमान एक वर्ष तरी लांबणीवर पडणार असल्याचे चित्र आहे. साहजिकच या भागातील प्रवाशांचा यामुळे हिरमोड होणार आहे. परंतु पर्यावरणाच्या संरक्षणासाठी एमएमआरडीएने घेतलेला हा निर्णय खरंच कौतुकास्पद आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा