Mumbai Metro News : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईत गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. हेच कारण आहे की मुंबईत मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर या शहरांमध्ये मेट्रोचे जाळे तयार केले जात आहे. या तिन्ही शहरांमध्ये मेट्रो सुरू झाली आहे.
मुंबई बाबत बोलायचं झालं तर मुंबईत आता एक नवीन मेट्रो मार्ग विकसित होणार आहे. हा नवीन मेट्रो मार्ग दक्षिण मुंबई मधील वाहतूक कोंडी फोडण्यास सक्षम राहणार आहे. गेट वे ऑफ इंडिया, क्रॉफर्ड मार्केट, मनिष मार्केट हे दक्षिण मुंबईतील काही लोकप्रिय ठिकाण आहेत.
दक्षिण मुंबईतील हा भाग नेहमीच गजबजलेला असतो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील होते. दक्षिण मुंबईमध्ये पर्यटकांची नेहमीच गर्दी असते.
यामुळे येथे होणारी गर्दी अन वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी वडाळा-सीएसएमटी भुयारी मेट्रो 11 मार्गिकेच्या आराखड्यात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या मेट्रो मार्गाच्या आराखड्यात बदल केला जाणार असून आता नागपाडा, भेंडी बाजार, क्रॉफर्ड मार्केट आणि गेट वे ऑफ इंडिया देखील मेट्रो ने जोडले जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर नवीन डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट अर्थातच डीपीआर तयार केला जात आहे. विशेष म्हणजे हा डीपीआर पुढल्या महिन्यापर्यंत तयार होण्याची शक्यता आहे.
आधी या मार्गाची जबाबदारी एमएमआरडीएकडे होती मात्र आता ही जबाबदारी एमएमआरसीकडे वर्ग करण्यात आली आहे. खरे तर हा मार्ग 70% अंडरग्राउंड आहे यामुळे याची जबाबदारी एम एम आर सी कडे आली आहे.
आधी एमएमआरडीएने या मार्गाचा आराखडा तयार केला होता मात्र एम एम आर सी ने या आराखड्यात आता बदल करण्याचा निर्णय घेतला असून दक्षिण मुंबईतील अनेक महत्त्वाचे ठिकाणे या नवीन आराखड्यात जोडली जाणार आहेत.
यानुसार क्रॉफर्ड मार्केट आणि गेट वे ऑफ इंडियाला आता थेट मेट्रो ने जाता येणार आहे. सध्या या ठिकाणाला भेटी द्यायच्या असल्यास सी एस एम टी वर उतरून प्रवाशांना इतर पर्यायी मार्गाने म्हणजे टॅक्सी किंवा पायी जावे लागते.
परंतु भविष्यात या ठिकाणाला मेट्रो ने भेट देता येणार आहे. यामुळे पर्यटकांची मोठी सोय होणार आहे शिवाय मुंबईकरांचा देखील प्रवास वाहतूक कोंडी मुक्त होणार आहे.