Mumbai Metro News : मुंबईकरांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता येत्या काही दिवसात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस होऊन कसारा पनवेल पालघर यांसारख्या उपनगरीय शहरात धावण्यासाठी मेट्रो कार्यान्वित केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
कसारा, पनवेल, पालघर येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मात्र तीस मिनिटात गाठता यावे म्हणून रॅपिड ट्रान्सपोर्ट साठी चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई बाहेरील शहरांना राजधानीला लवकर पोहचता यावे म्हणून रॅपिड ट्रान्सपोर्ट म्हणून जलद मेट्रो सुरू होणार आहे. ही जलद मेट्रोची संकल्पना काही नवखी नाही मात्र महाराष्ट्रात अद्याप जलद मेट्रो कोणत्याच मार्गावर धावत नाही.
जलद मेट्रो केवळ राजधानी दिल्ली येथे सध्या स्थितीला कार्यरत असून त्या ठिकाणी ती यशस्वी झाली आहे. दिल्लीच्याच धरतीवर आता राजधानी मुंबईमध्ये देखील जलद मेट्रो सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता कर्जत, कसारा, पनवेल, पालघर, ठाणे-डोंबिवली ही मुंबईच्या बाहेरील आणि लांब अंतरावरची स्टेशन्स रॅपिड ट्रान्सपोर्टने जोडली जाणार आहेत. अर्थातच राजधानी दिल्लीमध्ये जी जलद मेट्रो सुरू आहे त्याच जलद मेट्रोने जोडण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर चाचपणी देखील संबंधितांच्या माध्यमातून सुरू आहे. हाती आलेल्या माहितीनुसार नुकतेच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे अधिकारी दिल्लीच्या जलद मेट्रो प्रकल्पाला भेट देऊन आले आहेत. या अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळांने आपल्या दिल्ली भेटीदरम्यान जलद मेट्रोचा नेमका उपयोग जाणून घेतला आहे. याबाबत व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडें यांनी प्रसारमाध्यमांना सुचित केले आहे. वास्तविक ही जलद मेट्रो तब्बल 180 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावण्यास सक्षम असते.
राजधानी दिल्लीमध्ये याच वेगाने ही जलद मेट्रो धावत आहे. यामुळे लांब पल्ल्याच्या स्टेशनवर लवकरात लवकर गाठता येते आणि प्रवाशांचा मोठा वेळ वाचतो. निश्चितच शहरांदरम्यान दैनंदिन कामानिमित्त लाखो प्रवासी प्रवास करत असतात. कसारा, पनवेल, पालघर यांसारख्या मुंबई बाहेरील शहरांमधून देखील लाखो प्रवासी रोजाना मुंबईमध्ये कामानिमित्त दाखल होतात आणि घर वापसी त्याच दिवशी करत असतात.
याच पार्श्वभूमीवर जर या मुंबई बाहेरील शहरांना जोडण्यासाठी जलद मेट्रो सुरू करण्यात आली तर या लाखो प्रवाशांचा वेळ वाचणार आहे यात तीळ मात्र देखील शँका नाही. सध्या या मुंबई बाहेरील शहरांना जोडण्यासाठी लोकलचा पर्याय उपलब्ध आहेत, परंतु जलद मेट्रो यापेक्षा फायदेशीर पर्याय प्रवाशांसाठी ठरेल अशी आशा या निमित्ताने व्यक्त होत आहे. सध्या मुंबईमध्ये मेट्रोचे जाळे विणण्याचे काम सुरू आहे.
आतापर्यंत तीन मार्गीका सुरू करण्यात आल्या आहेत. एकूण आठ मार्गीकावर काम चालू असल्याची माहिती देण्यात आली आहे. निश्चितच भविष्यात मुंबईमध्ये मेट्रोचे जाळे झपाट्याने पसरणार आहे. सोबतच जलद मेट्रो देखील लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे.