Mumbai Metro News : मुंबईमधील नागरिकांचा प्रवास जलद आणि गतिमान करण्यासाठी शहरातील विविध मार्गावर मेट्रो सुरू केल्या जात आहेत. मेट्रोमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था बळकट झाली आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास गतिमान तर झालाच शिवाय सुरक्षित प्रवास प्रवाशांना करता येत आहे.
दरम्यान आता एम एम आर डी ए आणि महा मुंबई मेट्रो संचलन मंडळाने मेट्रो प्रवाशांना एक मोठी भेट दिली आहे. या दोन्ही प्राधिकरणाने बेस्टच्या मदतीने मेट्रो प्रवाशांना दिलासा देण्याचे काम केले आहे. बेस्टने गुंदवली मेट्रो स्थानक–वांद्रे-कुर्ला संकुल या मार्गांवर एसी बस सेवा सुरू केली आहे.
हे पण वाचा :- राज्य शासनाचा मोठा निर्णय; शेतकऱ्यांना आता ‘या’ बाबीसाठी मिळणार 2 लाखाचं अनुदान ! वाचा सविस्तर
यामुळे मेट्रो मार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. बेस्टच्या या निर्णयामुळे अंधेरी ते वांद्रे कुर्ला संकुल चा प्रवास गतिमान होणार आहे. ही बस सेवा मेट्रो प्रवाशांसाठी विशेष खास राहणार आहे.
त्यामुळे मेट्रो प्रवाशांना आपला प्रवास वेळेत पूर्ण करता येणार आहे आणि मेट्रो प्रवासानंतर त्यांना इच्छित स्थळापर्यंत पोहोचण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे बेस्टच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. दरम्यान आज आपण या बस सेवेसंदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी खुशखबर! बोरिवली ते विरारदरम्यान प्रवास होणार गतिमान; ‘या’ एका कारणामुळे लोकल ट्रेनचा वेग वाढणार
कसं असेल बेस्टच्या एसी बस चे वेळापत्रक
मिळालेल्या माहितीनुसार, गुंदवली ते वांद्रे-कुर्ला संकुल या मार्गावर सकाळी ०७.३० वाजल्यापासून ११.४० वाजेपर्यंत best ची ही एसी बस चालवली जाणार आहे. यादरम्यान ही एसी बस तब्बल 16 फेऱ्या मारणार आहे. तसेच वांद्रे-कुर्ला संकुल ते गुंदवली मार्गावर दुपारी ३.४० वाजल्यापासून रात्री ८.१५ वाजेपर्यंत बेस्टची एसी बस चालवण्याचे नियोजन असून या कालावधीमध्ये एकूण १३ फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.
या एसी बसचे तिकीट बुक करण्यासाठी प्रवाशांना बेस्टच्या चलो ॲप यावरून तिकीट बुक करावे लागणार आहे. निश्चितच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण तसेच महामुंबई मेट्रो संचालन मंडळाच्या पुढाकाराने बेस्ट ने सुरू केलेली ही वातानुकूलित बस सेवा मेट्रो प्रवाशांच्या दृष्टीने अति महत्त्वाची असून या बेस्टच्या एसी बसेसला प्रवासी चांगली पसंती दाखवतील अशी आशा व्यक्त होत आहे.
हे पण वाचा :- मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची ‘या’ कारणाने चिंता वाढली ! पहा….