मुंबईकरांसाठी खुशखबर ! नववी मेट्रो राजधानीत पोहचली, डिसेंबर मध्ये सुरू होणार ‘हा’ बहुचर्चीत मेट्रो मार्ग, कसा असेल रूटमॅप ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Metro News : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईत गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. मुंबईसोबतच मुंबई शहरालगत असलेल्या उपनगरीय परिसरात देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.

मुंबई शहरालगत असलेल्या उपनगरीय शहरांचा देखील झपाट्याने विस्तार झाला असल्याने या भागातील प्रवास आता आव्हानात्मक बनला आहे.

हेच कारण आहे की या वाहतूक कोंडीवर उपाययोजना म्हणून मुंबई आणि उपनगरात मेट्रोचे जाळे विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शहरातील काही महत्त्वाच्या मार्गांवर मेट्रो सुरू देखील झाली आहे.

विशेष म्हणजे मुंबईमधील आणखी एक नवीन मेट्रो मार्ग लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. मुंबई मेट्रोमार्ग 3 चा पहिला टप्पा लवकरच सुरू होणार आहे. या पहिल्या टप्प्यासाठी नऊ मेट्रो गाड्यांची गरज भासणार आहे.

आतापर्यंत पहिल्या टप्प्यातील संचालनासाठी आठ मेट्रो गाड्या मुंबई येथील आरे कारशेडमध्ये दाखल झाल्या होत्या. पण आता नववी गाडी देखील आरे येथे पोहोचली आहे. त्यामुळे कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ चा पहिला टप्पा लवकरच नागरिकांसाठी सुरू होणार असा आशावाद व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल तीन नोव्हेंबर 2023 रोजी आरे येथील कारशेडमध्ये नववी मेट्रो गाडी दाखल झाली.त्यामुळे आता मेट्रो 3 च्या पहिल्या टप्प्यादरम्यान ट्रायल रन लवकरच सुरू होणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की मुंबई मेट्रो रेल्वे कार्पोरेशनच्या माध्यमातून कुलाबा-वांद्रे-सीप्झ हा ३३.५ किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग विकसित केला जात आहे. हा संपूर्ण मेट्रो मार्ग भुयारी आहे.

हा मेट्रो मार्ग दोन टप्प्यात सुरू केला जाणार असून याचा पहिला टप्पा म्हणजेच आरे ते बीकेसी हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आता या पहिल्या टप्प्याच्या संचालनासाठी 9 मेट्रो देखील आरे येथील कारशेड मध्ये पोहोचल्या आहेत.

त्यामुळे या पहिल्या टप्प्यावर लवकरच चाचण्या घेतल्या जातील. या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर मग पहिल्या टप्प्यावर मेट्रो सुरु करण्यासाठी सुरक्षा प्रमाणपत्र मिळवले जाईल. सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले की मग या पहिल्या टप्प्यावर प्रत्यक्षात मेट्रो सुरू केली जाणार आहे.

हा पहिला टप्पा डिसेंबर 2023 पर्यंत सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू होऊ शकतो. यामुळे मुंबईकरांना लवकरच भुयारी मेट्रो मार्गाने प्रवास करता येणार असल्याचे चित्र तयार होत आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा