Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी एक अतिशय मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे मुंबईच्या लाईफलाईनबाबत म्हणजेच मुंबई लोकलबाबत. खरतर, मुंबई आणि उपनगरात प्रवास करण्यासाठी लोकलचा सर्वाधिक वापर केला जातो. दरम्यान याच मुंबईच्या लाईफलाईनच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.
खरंतर मुंबईमध्ये रात्रपाळीत काम करणाऱ्या नोकरदारांना सकाळी घरी परतण्यासाठी सकाळी सुटणाऱ्या 5:46 च्या कर्जत लोकलची वाट पाहावी लागते. रात्रभर जीवाचे रान करून रात्रपाळीत काम करणारा नोकरदार वर्ग सकाळी घराकडे रवाना होतो. मात्र, सकाळी घरी जाताना सर्वसामान्यांना तब्बल पाच वाचून 46 मिनिटांनी धावणाऱ्या कर्जत लोकलची वाट पहावी लागते. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांचे हे हाल पाहून मध्य रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेने सकाळी धावणाऱ्या फास्ट लोकल बाबत एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे घेतलेल्या या नवीन निर्णयानुसार आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून पहिली फास्ट लोकल चार वाजून 35 मिनिटांनी सुटणार आहे. याआधी पहिली फास्ट लोकल पाच वाजून वीस मिनिटांनी सुटत होती.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सीएसएमटीवरून पहिली धिमी लोकल अर्थातच कसारा लोकल ४.१९ ला धावते. तसेच पहिली खोपोली लोकल ४.२४ ला रवाना होते. आता याच खोपोली लोकलला जलद लोकल म्हणून चालवली जाणार आहे. तसेच याच्या वेळेत मोठा बदल होणार आहे. ही खोपोली लोकल जलद लोकल म्हणून 4 वाजून 35 मिनिटांनी चालवली जाणार आहे.
विशेष बाब म्हणजे याची अंमलबजावणी उद्यापासून अर्थातच दहा ऑगस्ट 2023 पासून होणार आहे. खरतर, आतापर्यंत प्रवाशांना सकाळी घरी परतण्यासाठी जलद लोकलसाठी पहिली जलद लोकल म्हणून 5 वाजून 20 मिनिटांनी धावणाऱ्या कल्याण जलद लोकलची वाट पाहावी लागत असे. विशेष म्हणजे ही कल्याण लोकल वातानुकूलित असल्याने सर्वसामान्य प्रवासी या लोकलने प्रवास करत नसत.
तर साध्या जलद लोकलसाठी त्यांना ५.४६ च्या कर्जत जलद लोकलची वाट पाहावी लागत असे. पण आता 4 वाजून 24 मिनिटांनी धावणारी धिमी खोपोली लोकल 4 वाजून 35 मिनिटांनी जलद लोकल म्हणून चालवली जाणार असल्याने याचा प्रवाशांना फायदा होणार आहे.
तसेच ही लोकल भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण या स्थानकावर थांबणार असून कल्याण ते खोपोलीदरम्यान सर्व स्थानकावर ही लोकल थांबणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी नुकतीच दिली आहे.