मुंबई लोकलचा प्रवास होणार गतिमान ! 2 तासाचा प्रवास येणार दिड तासावर, ‘या’ भागात तयार होणार नवीन रेल्वे कॉरिडॉर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Local Railway News : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई शहर कोणासाठी आणि कधीच थांबत नाही. शहरातील लोकल देखील तशीच आहे. ही पण कोणासाठीच थांबत नाही. यामुळे लोकलने प्रवास करणाऱ्या लोकांना अगदी वायू वेगाने स्टेशनं गाठाव लागत.

जर कामावरून निघण्यास थोडा उशीर झाला तर लोकल चुकते अन घरी जायला खूपच उशीर होतो, तसेचं जर घरून निघायला थोडा उशीर झाला आणि लोकल चुकली तर मग संपूर्ण दिवसाचं गणित बिघडतं.

एकूणचं काय मुंबईकरांना लोकल प्रवासासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावर उपाययोजना म्हणून शहरात मेट्रो सुरु केली जात आहे. नागरिकांचा प्रवास जलद, सुरक्षित आणि आरामदायी व्हावा यासाठी शहराला मेट्रोची कनेक्टिव्हिटी पुरवली जात आहे.

मात्र संपूर्ण शहरात लोकल प्रमाणे मेट्रोचे जाळे विकसित करण्यासाठी कित्येक वर्षांचा काळ लागणार आहे. तोपर्यंत मुंबईकरांसाठी लोकल हीच लाईफ लाईन राहणार आहे.अशातच आता सीएसएमटी ते कर्जत या दरम्यान लोकलने प्रवास करणाऱ्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.

हा लोकल प्रवास लवकरच जलद आणि सुरक्षित होणार आहे.सध्या स्थितीला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जत दरम्यान प्रवासासाठी जवळपास दोन तासाहून अधिकचा वेळ खर्च करावा लागत आहे. मात्र प्रवासाचा हा कालावधी लवकरच कमी होणार आहे.

येत्या काही दिवसात या प्रवासाच्या कालावधीत अर्ध्या तासांची बचत होणार आहे. खरंतर पनवेल आणि कर्जत भागात वाढते नागरिकीकरण पाहता या ठिकाणी रेल्वेचे जाळे विकसित करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहे.

दरम्यान आता रेल्वे विभागाकडून पनवेल आणि कर्जतला जोडणारा एक दुहेरी रेल्वे कॉरिडॉर विकसित केला जात आहे. मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन अर्थातच एमआरवीसीकडून हा प्रकल्प पूर्ण केला जात आहे.

रेल्वे बोर्डाचे इन्फ्रास्ट्रक्चर विभागाचे सदस्य रुप नारायण शंकर यांनी ही माहिती दिली आहे. या प्रकल्पासाठी 57 हेक्टर खाजगी जमीन आणि 4.4 हेक्टर शासकीय जमीन उपयोगात आणली आहे.

त्यामध्ये काही जमीन ही वनविभागाची सुद्धा आहे. या नवीन रेल्वे कॉरिडॉरमुळे नवी मुंबई आणि रायगड अगदी सहजपणे मोठ्या शहराशी जोडले जाणार आहे. या प्रकल्पामुळे सीएसएमटी ते कर्जत या प्रवासाच्या कालावधीत 30 मिनिटांची बचत होणार असा दावा केला जात आहे.

यांमुळे हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सीएसएमटी ते कर्जत दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना वेळेत घरी जाता येणार आहे. या कॉरिडॉरचे आतापर्यंत 46% एवढे काम पूर्ण झाले असून 2025 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. 

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा