Mumbai Local News : वंदे भारत एक्सप्रेस च्या आगमनाने भारतीय रेल्वेचा चेहरा मोहरा बदलला आहे. रेल्वेचा प्रवास आता अधिक गतिमान झाला आहे. हेच कारण आहे की, वंदे भारत एक्सप्रेसचा आता विस्तार केला जात आहे. वंदे भारत एक्सप्रेस लवकरच स्लीपर कोच मध्ये देखील तयार केल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे वंदे भारत एक्सप्रेस च्या धरतीवर वंदे मेट्रो सुरु करण्याचे नियोजन रेल्वेने आखले आहे. या अनुषंगाने काम देखील सुरू झाले आहे.
दरम्यान आता मुंबईकरांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मुंबईमध्ये वंदे भारतच्या धरतीवर लवकरच वंदे लोकल ट्रेन सुरू होणार आहेत. लोकल प्रवास आरामदायी करण्यासाठी आणि लोकल प्रवासादरम्यान होणाऱ्या अपघातांची मालिका टाळण्यासाठी रेल्वेच्या माध्यमातून वंदे लोकल सुरू केल्या जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस आता ‘या’ ठिकाणी थांबणार; केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी दिली मंजुरी
संपूर्ण स्वदेशी बनावटीची वंदे भारत ट्रेन आपल्या आरामदायी प्रवासामुळे आणि स्पीडमुळे अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीसं खरी उतरली आहे. सध्या स्थितीला देशात एकूण दहा वंदे भारत ट्रेन सुरू असून यापैकी चार वंदे भारत ट्रेन आपल्या राज्यात धावत आहेत. अशातच आता राजधानी मुंबईमध्ये वंदे लोकल सुरू होणार आहे, निश्चितच मुंबईकरांना मोठा फायदा यामुळे होईल. यावर अद्याप कोणतीच घोषणा झालेली नाही, मात्र प्राथमिक स्वरूपात रेल्वे बोर्डाचा याबाबत अभ्यास सुरू आहे.
एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्टला रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच रेल्वे बोर्डाकडून याबाबत घोषणा होणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे विभागीय व्यवस्थापक रचनीष गोयल यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे बोर्ड राजधानी मुंबईत वंदे लोकल सुरू करण्याची शक्यताची चाचपणी करत आहे.
हे पण वाचा :- पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ मार्गावर तयार होणार नवीन फ्लायओव्हर, 53 हजार कोटींची तरतूद; नितीन गडकरींची माहिती
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या स्थितीला मुंबई व उपनगरात लोकलच्या माध्यमातून 70 लाख प्रवासी रोजाना प्रवास करतात. यासोबतच ज्या काही एसी लोकल गाड्या रेल्वेने सुरू केले आहेत त्यांना देखील प्रवाशांचा अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत आहे. यामुळे वातानुकूलित लोकल अर्थातच एसी लोकलच्या जागी वंदे लोकल ट्रेन सुरू होतील असा दावा केला जात आहे.
राजधानीमधील प्रवाशांना आरामदायी प्रवास देणे, सध्या स्थितीला सुरू असलेल्या लोकलमधील अपघातावर आळा घालणे आणि जलद गतीने प्रवासासाठी वंदे लोकलची संकल्पना पुढे येत आहे. निश्चितच शहरात वंदे लोकल धावल्यास मुंबईकरांना यामुळे मोठा फायदा होईल आणि त्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि गतिमान होईल यात तीळमात्र देखील शंका नाही.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! आता ‘त्या’ मार्गावरही धावणार बेस्टची ई-डबल डेकर बस; ‘या’ दिवशी सुरु होणार सेवा