Mumbai Kolhapur Vande Bharat Railway : देशात गेल्या काही महिन्यांपासून वंदे भारत एक्सप्रेसची विशेष चर्चा पाहायला मिळत आहे. 2019 मध्ये सुरू झालेल्या या एक्सप्रेस ट्रेनला आता 5 वर्षांचा काळ पूर्ण झाला आहे. आत्तापर्यंत देशातील 41 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू झाली आहे.
5 वर्षात 41 अप आणि डाऊन मार्गांवर 82 वंदे भारत ट्रेन सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे या एक्सप्रेस ट्रेनला प्रवाशांची विशेष पसंती लाभत आहे. त्यामुळे रेल्वे देखील वेगवेगळ्या मार्गांवर ही गाडी सुरू करण्यासाठी इच्छुक आहे.
अशातच जानेवारी 2024 मध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राजधानी मुंबई ते कोल्हापूर दरम्यान नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार अशी मोठी घोषणा केली. त्यावेळी त्यांनी ही गाडी केव्हा सुरू होणार याबाबत कोणतीच माहिती दिलेली नव्हती.
यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये वंदे भारत एक्सप्रेस केव्हा सुरू होणार असा सवाल उपस्थित होत आहे. सर्वसामान्यांना देखील या गाडीची आतुरता लागली आहे.
अशातच मात्र सोशल मीडियामध्ये एक पोस्ट वेगाने व्हायरल होत आहे ज्यामध्ये 18 फेब्रुवारीला मुंबई ते कोल्हापूर दरम्यानेच्या वंदे भारत एक्सप्रेसची सुरुवात होईल असा दावा करण्यात आला आहे. सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असलेल्या या पोस्टमध्ये एक परिपत्रक देखील पाहायला मिळत आहे.
या परिपत्रकात मुंबई ते कोल्हापूर, पटणा ते लखनऊ, देरादून ते लखनऊ, लखनऊ ते वाराणसी आणि हावडा ते वाराणसी या मार्गावर 18 फेब्रुवारी 2024 ला वंदे भारत एक्सप्रेस सुरू होतील असा दावा करण्यात आला आहे.
मात्र खरच रेल्वे या पाच मार्गांवर 18 तारखेला वंदे भारत एक्सप्रेस सुरू करणार आहे का ? याबाबत रेल्वेने मोठी माहिती दिली आहे. रेल्वे विभागाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबाबत माहिती दिली आहे.
मंत्रालयाने 18 तारखेला या पाच वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचे कोणतेच नियोजन नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मुंबई ते कोल्हापूर गाडी १८ तारखेला सुरू होणार ही सोशल मीडियामध्ये सुरू असलेली चर्चा निरर्थक असल्याचे सिद्ध झाले आहे.
तथापि मुंबई ते कोल्हापूर दरम्यान लवकरात लवकर वंदे भारत एक्सप्रेस सुरू व्हावी यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.
त्यामुळे लवकरच मुंबई ते कोल्हापूर या मार्गावर ही हाय स्पीड ट्रेन सुरू होईल आणि राज्यातील रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळेल अशी आशा आहे.