Mumbai Job : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ज्या तरुणांना मुंबई आणि नागपूर मध्ये सरकारी नोकरी करावयाची असेल अशा तरुणांसाठी ही निश्चितच सुवर्णसंधी राहणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या ठिकाणी मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थातच एम एस टी सी अंतर्गत विशेष कर्तव्य अधिकारी या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
अशा परिस्थितीत आज आपण या पदभरती संदर्भात काही महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या पदभरती संदर्भात आवश्यक माहिती.
किती पदांसाठी आयोजित झाली आहे भरती
मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विशेष कर्तव्य अधिकारी या पदाच्या एकूण 62 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या अंतर्गत पदभरती झालेल्या उमेदवारांना मुंबई आणि नागपूर या ठिकाणी नोकरी करावी लागणार आहे.
अर्ज कसा करायचा
या पद भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले असून इच्छुक उमेदवारांना https://www.mstcindia.co.in/MSTC_Careers/ या लिंक वर जाऊन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यापूर्वी आवश्यक पात्रता मात्र काळजीपूर्वक वाचणे आवश्यक राहणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक
या पदभरतीसाठी 13 मार्च 2023 पर्यंत इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
अर्ज फी
या पदाभरतीसाठी 590 इतकी अर्ज फी इच्छुक उमेदवारांना द्यावी लागणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
या पदभरतीसाठी 21 ते 62 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या पदभरतीसाठी मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. ग्रॅज्युएशन मध्ये 60 टक्के किमान मार्क असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. तसेच ज्या उमेदवारांनी पोस्ट ग्रॅज्युएशन जसे की MBA आणि पोस्ट डिप्लोमा कम्प्लीट केले असेल अशा उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
किती वेतन मिळणार
विशेष कर्तव्य अधिकारी या पदासाठी ही पदभरती आयोजित असून या पदाला 40000 ते 1 लाख 20 हजार दरम्यान वेतनमान राहणार आहे.
निवड प्रक्रिया कशी राहील
या पदभरतीसाठी थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड होणार आहे. मुलाखतीची तारीख ही अर्जदार उमेदवाराला एसएमएस ई-मेल किंवा अन्य उपलब्ध माध्यमातून कळवली जाणार आहे.
जाहिरात कुठे पाहायची
या पदभरती संदर्भात निघालेली यादी सूचना अथवा जाहिरात पाहण्यासाठी एम एस टी सी रिक्रुटमेंट 2023 यावर क्लिक करा.