मुंबई ते जालना दरम्यान 8 डब्ब्यांची वंदे भारत एक्सप्रेस चालणार की 16 डब्ब्यांची ? समोर आली मोठी अपडेट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Jalna Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसची दिवसेंदिवस वाढणारी लोकप्रियता पाहता आता देशातील सर्वच महत्त्वाच्या मार्गावर या गाडीला लॉन्च केले जाणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार मार्च 2024 पर्यंत देशातील 75 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू होऊ शकते. विशेष म्हणजे मुंबईला देखील काही वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे.

सध्या मुंबईतून चार वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे. मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव या चार मार्गांवर ही गाडी सूरु आहे.

येत्या काही महिन्यांमध्ये मुंबई ते जालना, मुंबई ते अहमदाबाद, मुंबई ते कोल्हापूर या मार्गांवर देखील या गाडीचे संचालन सुरू होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मुंबई ते जालना या मार्गावर या चालू वर्षाखेरपर्यंत वंदे भारत एक्सप्रेस सुरू होऊ शकते. खरे तर राजधानी मुंबईत मराठवाड्यातून रोजाना हजारोंच्या संख्येने नागरिक दाखल होत असतात. कामानिमित्त तसेच पर्यटनासाठी मुंबईला येणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

मराठवाड्यातून मुंबईला येणाऱ्यांची हीच संख्या लक्षात घेता आता या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय बनावटीची हाय स्पीड ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या निर्णयामुळे जालना जिल्ह्यासहित मराठवाड्यातील इतरही जिल्ह्यांना मोठा फायदा होणार आहे.

यामुळे मराठवाड्याला पर्यटन, कृषी, शैक्षणिक अशा विविध विभागात प्रगती साधता येणार आहे. खरे तर भारतीय रेल्वेकडून अलीकडे ज्या वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आल्या आहेत त्या वंदे भारत एक्सप्रेस फक्त आठ डब्यांच्या आहेत.

सुरुवातीच्या टप्प्यात 16 डब्ब्यांची वंदे भारत एक्सप्रेस चालवली जात होती. मात्र नंतर डब्यांची संख्या कमी झाली आणि आता अधिकतर आठ डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला देखील फक्त आठच डबे आहेत. यामुळे मुंबई ते जालना दरम्यान सुरू होणाऱ्या या गाडीला किती डब्बे राहणार हा सवाल उपस्थित केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या हायस्पीड ट्रेनला फक्त आठ डबे राहणार आहेत.

म्हणजेच या मार्गावर फक्त आठ डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. मुंबई ते जालना रेल्वे मार्गावर सुरू असलेली बहुतांशी कामे आता पूर्ण झाली आहेत. त्यामुळे ही हाय स्पीड ट्रेन येत्या काही दिवसात प्रवाशांच्या सेवेत दाखल होऊ शकते असे मत व्यक्त केले जात आहे.

डिसेंबर अखेरपर्यंत ही गाडी प्रवाशांच्या सेवेत येण्याची शक्यता आहे. तथापि रेल्वे विभागाकडून या गाडीच्या उद्घाटनाची तारीख अजून डिक्लेअर करण्यात आलेली नाही. यामुळे ही गाडी यावर्षी अखेरपर्यंत खरंच सुरू होणार का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा