आनंदाची बातमी ! मुंबई-जालना वंदे भारत एक्सप्रेसचे वेळापत्रक जाहीर ; कसे राहणार Timetable ? वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai-Jalna Vande Bharat Express : मराठवाड्यातील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर आली आहे. देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई ते जालना दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाणार आहे.

ही गाडी छत्रपती संभाजीनगर मार्गे चालवली जाणार आहे. यामुळे जालना छत्रपती संभाजीनगर सह संपूर्ण मराठवाड्यातील मुंबईकडे जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. परिणामी, मराठवाड्यातील नागरिकांचा मुंबईकडील प्रवास गतिमान आणि सुरक्षित होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी या गाडीला 30 नोव्हेंबर 2023 रोजी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तत्पूर्वी मात्र या गाडीचे प्रस्तावित वेळापत्रक समोर आले आहे. अशा परिस्थितीत आज आपण मुंबई ते जालना दरम्यान सुरू होणाऱ्या या वंदे भारत एक्सप्रेसचे प्रस्तावित वेळापत्रक कसे आहे याबाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसं राहणार वेळापत्रक 

जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस चे वेळापत्रक : ही गाडी जालना येथून पहाटे पाच वाजून पाच मिनिटांनी मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे आणि दुपारी अकरा वाजून 55 मिनिटांनी ही गाडी राजधानी मुंबईत पोहोचणार आहे.

मुंबई-जालना वंदे भारत एक्सप्रेसचे वेळापत्रक : मिळालेल्या माहितीनुसार ही गाडी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी रवाना होणार आहे आणि जालना येथे रात्री साडेआठ वाजता पोहोचणार आहे.

कुठं मिळणार थांबा

रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, ही गाडी छत्रपती संभाजी नगर, अंकाई, मनमाड, नासिक, इगतपुरी, ठाणे या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.

महाराष्ट्रात सध्या किती वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत

महाराष्ट्रात सध्या सहा वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, नागपूर ते बिलासपुर आणि इंदोर ते नागपूर या मार्गावर ही गाडी धावत आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा