गणपती बाप्पा पावला ! मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा ‘या’ दिवशी सुरु होणार, पण….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Goa Expressway : मुंबई गोवा महामार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी गणेशोत्सवाच्या पूर्वीच एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कशेडी घाटातील बोगदा लवकरच वाहतुकीसाठी सुरू होणार आहे.

यामुळे कोकणवासीयांचा कोकणातला प्रवास आता गतिमान होणार असा आशावाद व्यक्त केला जात आहे. कशेडी बोगदा जर सुरू झाला तर मुंबईहून गोव्याकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार असून या बोगद्यामुळे प्रवासाचा तब्बल 20 मिनिटांचा कालावधी वाचणार असे बोलले जात आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

केव्हा सुरु होणार बोगदा

यावर्षी गणेशोत्सवाचा पर्व 19 सप्टेंबरला सुरू होणार आहे. मंगळवारी अर्थातच 19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गणेशोत्सवाला सुरुवात होईल आणि 28 सप्टेंबर अर्थातच अनंत चतुर्दशी पर्यंत हा सोहळा सुरू राहणार आहे. दरवर्षी गणेशोत्सवाला मुंबईतून मोठ्या प्रमाणात चाकरमाने कोकणात आपल्या गावी परतत असतात.

मात्र कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मुंबईहून कोकणात जाताना कशेडी घाट पार करून जावे लागते. कशेडी घाटातील प्रवास मात्र नेहमीच जीवघेणा राहिला आहे. मात्र आता प्रवाशांना कोकणात जाताना हा घाटातील धोकादायक प्रवास करण्याची गरज राहणार नाही.

कारण की आता कशेडी बोगद्याची एक लेन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या आठ दिवसात ही लेन सुरू होणार अशी माहिती समोर आली आहे. अर्थातच गणेशोत्सवाला जाणाऱ्या चाकरमान्यांना आता कशेडी बोगद्यातून प्रवास करता येणार आहे.

त्यामुळे त्यांचा प्रवासाचा वीस मिनिटांचा कालावधी वाचणार आहे. सध्या कशेडी घाटातून प्रवास करण्यासाठी अर्धा तासाचा वेळ लागतो. अवजड वाहनांना तर याहीपेक्षा अधिक वेळ खर्च करावा लागतो. मात्र या नवीन बोगद्यामुळे म्हणजे कशेडी बोगद्यातून केवळ दहा मिनिटात प्रवास होणार आहे.

या नवीन बोगद्यामुळे तब्बल साडेसात किलोमीटरच अंतर कमी होणार आहे. कशेडी घाटात मुंबईकडे जाण्यासाठी आणि कोकणात जाण्यासाठी दोन स्वातंत्र बोगदे तयार केले जात आहेत. हे बोगदे रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना कनेक्ट करणार आहेत.

दोन किलोमीटरचे बोगदे आणि दोन्ही बाजूचे जोड रस्ते असे एकूण 11 किलोमीटरचे हे अंतर आहे. आता यापैकी मुंबईकडे जाणारी एक लेन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू केली जाणार आहे. गणेशोत्सवापूर्वी ही लेन सुरू होईल आणि गणेशोत्सव संपला की ही लेन पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद केली जाणार आहे.

तसेच ही एक लेन केवळ कार, जीप, रिक्षा आणि तत्सम हलक्या वाहनांसाठी सुरू केली जाणार आहे. यावर अवजड वाहनांना परवानगी राहणार नाही. एकूणच गणेशोत्सवाच्या काळासाठी ही लेन सुरू केली जाणार आहे आणि गणेशोत्सवासाठी गेलेल्या चाकरमान्यांचा परतीचा प्रवास झाला की पुन्हा एकदा ही लेन काही काळासाठी बंद केली जाणार आहे.